अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 23:09 IST2022-01-22T23:09:17+5:302022-01-22T23:09:28+5:30
राष्ट्रीय महामार्गावर हेंडज फाट्यावरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार
मूर्तिजापूर : तालूक्यातील रंभापूर येथील दोन युवक नेहमीप्रमाणे दूचाकीने मूर्तिजापूर येथे डेअरीमध्ये दुध घेऊन येत असता राष्ट्रीय महामार्गावर हेंडज फाट्यावर अज्ञात वाहनाने २२ जानेवारी रोजी रात्री ७:३० वाजताच्या दरम्यान दुचाकीस धडक देऊन झालेल्या अपघातात २ जण ठार झाले
रंभापूर येथील बाळासाहेब रमेश निलखन (२७) व मिलिंद अशोक तांबडे (२४) हे दोन युवक आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० एएस १७३० ने मूर्तिजापूर येथे डेअरीमध्ये दुध घेऊन येत असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघेही दुचाकीस्वार घटनास्थळीच ठार झाले. या घटनेने रंभापूर गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीसांसह वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले