सनदी लेखापाल विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 06:22 PM2019-12-15T18:22:32+5:302019-12-15T18:22:39+5:30
या राष्ट्रीय लेखापाल अधिवेशनात देशभरातील ४५० लेखापाल विदयार्थी सहभागी होणार आहेत.
अकोला : इन्सीट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया अकोला आणि वेस्टर्न इंडिया सीटी स्टुडंट्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सनदी लेखापाल विद्यार्थ्यांचे द्वि दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन १७ व १८ अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होते आहे. या राष्ट्रीय लेखापाल अधिवेशनात देशभरातील ४५० लेखापाल विदयार्थी सहभागी होणार आहे. ही माहीती रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष दुर्गेश काबरा उद् घाटक म्हणून लाभणार असून आयसीएआयच्या सेंट्रल कौन्सिल सदस्य दिल्ली येथील राजेश शर्मा, मुंबई येथील अनिल भंडारी, सी.व्ही.चितळे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. सोबतचं डब्ल्यूआयआरसीच्या प्रीती सावला व डब्ल्यूआयसीएसचे जयेश काला देखिल उपस्थित राहतील.विशेष व्याख्याते म्हणून नागपूरचे अभिजित केळकर,वडोदराचे विशाल जोशी,मुंबईचे अर्पित काबरा,ठाण्याचे मंगेश किनारे, नागपूरचे कमलकिशोर राठी, औरंगाबादचे उमेश शर्मा,मुंबईचे प्रणय कोचर,पुण्याच्या अंकिता बोरा,आनंद जाखोटिया आदी हजेरी लावणार आहेत. अधिवेशनाच्या निमित्ताने १५ विदयार्थी विविध विषयावर या संमेलनात राष्ट्रीय पेपर सादर करतील.