अमरावतीच्या इज्तेमासाठी दोन दिवस विशेष रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 01:53 PM2019-12-01T13:53:33+5:302019-12-01T13:54:06+5:30
अकोला : अमरावती जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या मुस्लीम बांधवांच्या दोन इज्तेमासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दोन दिवस विशेष ...
अकोला : अमरावती जिल्ह्यात ७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या मुस्लीम बांधवांच्या दोन इज्तेमासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दोन दिवस विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लीम समाजाच्या या कार्यक्रमासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे करण्यात आली होती. ती मागणी मान्य करीत रेल्वे प्रशासनाने अधिकृत घोषणा केली असून, ६ आणि ९ डिसेंबर रोजी अतिरिक्त गाड्या धावणार आहेत.
गाडी क्रमांक ०१२९५ डाउन मनमाड-बडनेरा विशेष साधारण गाडी शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी मनमाड येथून १४.५० वाजता निघेल. ती गाडी २३.४५ वाजता बडनेरा येथे पोहोचेल. या गाडीला चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर येथे थांबा राहील. नागपूर-मनमाड विशेष साधारण गाडी वन-वे फेरी चालणार आहे. गाडी क्रमांक ०१२९८ अप नागपूर-मनमाड विशेष साधारण सोमवार, ९ डिसेंबर रोजी नागपूर येथून १७.३० वाजता निघेल, ती दुसऱ्या दिवशी ०४.२० वाजता मनमाड येथे पोहोचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव येथे थांबा राहील. बल्लारशाह ते बडनेरा विशेष साधारण गाडी वन-वे फेरी राहणार आहे. गाडी क्रमांक ०१२९६ अप बल्लारशाह-बडनेरा विशेष साधारण गाडी ६ डिसेंबर रोजी बल्लारशाह येथून १४.०० वाजता निघेल. ती गाडी १८.३५ वाजता बडनेरा येथे पोहोचेल. या गाडीला चंद्रपूर, वरोरा, वर्धा, धामणगाव येथे थांबा राहील. गाडी क्रमांक ०१२९७ डाउन बडनेरा-बल्लारशाह विशेष साधारण गाडी सोमवार, ९ डिसेंबर रोजी २३.४० वाजता निघेल. दुसºया दिवशी सकाळी ४ वाजता बल्लारशाह येथे पोहोचेल. या गाडीला धामणगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर थांबा राहील.