वान धरणाचे दोन द्वार उघडले; नदी पात्रात विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 02:12 PM2018-08-24T14:12:42+5:302018-08-24T14:22:08+5:30
संग्रामपूर/तेल्हारा : अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले वारी हनुमान येथील वान धरणाचे कमाक १ व ६ असे दोन दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात आले.
संग्रामपूर/तेल्हारा : अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले वारी हनुमान येथील वान धरणाचे कमाक १ व ६ असे दोन दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात आले असुन, १५. ५८ प्रति सेकंद विसर्ग वान नदी पात्रात सोडण्यात येत आहे. हनुमान सागर धरणातील पाणी वान नदी पात्रात आज सकाळी 11:30वा. च्या सुमारास सोडण्यात आले.
वारी येथील धरणाची उंची समुद्र सपाटी पासून 403.51मिटर आहे. धरणाचा उपयुक्त साठा क्षमता 71.53 आहे तर सद्या धरणामध्ये 87.28 पाणी साठा उपलब्ध आहे. तसेच धरणातून एकहजार मेगावँट विघुत निर्मिती करण्यात येत आहे. येथे दररोज विस ते पंचविस हजार युनिट या विद्युत संचातून जनरेट होतात. विद्युत संच असल्याने धरणातून आधीची पाण्याचा विसर्ग सुरू होता. पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाचे पहील्या व सहाव्या क्रमांकाचे असे दोन गेट दहा सें.मी. उडण्यात आले असुन नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
(तालुका प्रतिनिधी)