दोन शेतकरी आत्महत्या

By admin | Published: October 22, 2015 01:48 AM2015-10-22T01:48:24+5:302015-10-22T01:48:24+5:30

अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी मंगळवारी आत्महत्या केली.

Two Farmers Suicide | दोन शेतकरी आत्महत्या

दोन शेतकरी आत्महत्या

Next

अकोला: नापिकी आणि कर्जबाजारीपणास कंटाळून अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी मंगळवारी आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील प्रदीप श्रीराम बोबडे (वय ४५) व त्यांच्या भावाकडे १ एकर शेत होते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका संपूर्ण जिल्ह्यातील पिकांना बसला. या संकटातून प्रदीप बोबडेही वाचू शकले नाहीत. यंदा त्यांना १ क्विंटल १८ किलो सोयाबीनचे उत्पादन झाले. कर्ज कसे फेडावे, संसाराचा गाडा कसा ओढावा, या विवंचनेतच त्यांनी मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज होते. शेतकरी आत्महत्येची दुसरी घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात घडली. सततची नापिकी आणि कर्जाचा बोजा, याशिवाय व्यवसायासाठी केलेल्या प्रयत्नांमध्येही अपयश; एकूणच परिस्थितीमुळे जगणे असहय़ होऊन या तालुक्यातील शिंदी हराळी येथील भागवत मोतेसिंग मोरे (वय ३८) नामक शेतकर्‍याने मंगळवारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आई, पत्नी, दोन भाऊ आणि तीन मुले या सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी या तरूण शेतकर्‍यावर होती. त्यांच्या दोन भावांपैकी एक भाऊ सतत आजारी, तर दुसरा अपंग आहे. ३ एकर कोरडवाहू शेतीवर त्यांच्या संसाराचा गाडा कसाबसा चालू होता; मात्र सततच्या नापिकीमुळे आर्थिक परिस्थिती खालावली, कृषी कर्जाची परतफेडही होवू शकली नाही. शेतीला जोडधंदा म्हणून ऑटोरिक्षा चालविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातही अपयश आल्याने भागवत मोरे यांनी मंगळवारी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य झोपेत असताना पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

Web Title: Two Farmers Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.