म्हैसांग येथे दोन गटात जोरदार हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:16 PM2017-09-20T19:16:16+5:302017-09-20T19:20:50+5:30
बोरगाव मंजू (अकोला): बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया म्हैसांग येथे २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान दोन गटात तुफान हाणामारी होऊन ठाणेदार काटकर यांच्यासह १६ जण जखमी झाले. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

म्हैसांग येथील गायरान जमिनीवर काही लोकांनी केलेले अतिक्रमण हटविण्याच्या कारणावरून बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास तेथील दोन गट समोरासमोर आले. यावेळी दोन्ही गटातील लोकांमध्ये प्रथम शाब्दीक वाद झाला. त्यानंतर त्याचे रूपांतर दोन गटात जबर हाणामारी होण्यात झाले. याबाबत माहिती कळताच बोरगाव मंजू पोलिसांनी तेथे पोहोचून सुरुवातीला प्रथम सामंजस्याची भूमिका घेत दोन्ही गटांना समजावून परस्परापासून दूर करण्याचा प्रयत्न केला; परंतु जमाव पांगत नसल्याचे दिसताच पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी लाठीमार्च व दोन गटातील हाणामारीत बोरगाव मंजुचे ठाणेदार पी. के. काटकर व जमावातील १५ जण जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर अकोला येथून राखीव पोलीस दल व आरसीपीचे जवान घटनास्थळी रवाना झाले असून वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.