दोन लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे अनुदानीत बियाणे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:11 PM2019-06-21T14:11:32+5:302019-06-21T14:11:41+5:30

अकोला : महाराष्टÑ राज्य बियाणे (महाबीज)महामंडळाने यावर्षी २ लाख ८० हजार क्ंिवटल सोयाबीनचे अनुदानीत बियाणे उपलब्ध केले आहे.

 Two hundred and eighty thousand quintals of soyabean seed! | दोन लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे अनुदानीत बियाणे !

दोन लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे अनुदानीत बियाणे !

Next

अकोला : महाराष्टÑ राज्य बियाणे (महाबीज)महामंडळाने यावर्षी २ लाख ८० हजार क्ंिवटल सोयाबीनचे अनुदानीत बियाणे उपलब्ध केले आहे. यात राष्टÑीय अन्न सुरक्षा व ग्राम बीजोत्पादन योजनेतील बियाण्याचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना बियाणे पुरविण्यासाठी दरवर्षी महाबीजला शासन अनुदान उपलब्ध करू न देते. महाबीज शेतकऱ्यांना त्या बदल्यात बियाणे उपलब्ध करू न देते. यावर्षी सर्वाधिक २ लाख ८० हजार क्ंिवटल सोयाबीनचे बियाणे महाबीजने उपलब्ध केले आहे. यामध्ये राष्टÑीय अन्न सुरक्षा योजनेतील एक लाख तर ग्राम बीजोत्पादन योजनेतील १ लाख ८० हजार क्ंिवटलचा बियाण्याचा समावेश आहे. तूर, उडीदसह इतर बियाण्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात अनुदानावरील बियाणे वितरणासाठी लागणारे परमीट वितरणाचे काम महाबीजनेच हाती घेतले आहे.
राज्यात सर्वत्र बियाणे वाटपास सुरुवात झाली आहे. तथापि, अकोला जिल्ह्यातील शेतकºयांना अनुदानावरील बियाणे वितरणास विलंब झाला. हे बियाणे वितरणासाठी शेतकºयांना परमीट वितरीत करावी लागतात. दरवर्षी कृषी विभाग शेतकºयांना परमीट वितरीत करीत होते. तथापि, यावर्षी कृषी विभागाने परमीट वितरणास नकार दिला. परमीटशिवाय विक्रेते शेतकºयांना बियाणे देण्यास तयार नव्हते. परिणामी, अनुदानावरील बियाणे घेण्यास शेतकºयांना विलंब झाला. कृषी विभाग नकार देत असल्याने खरेदी-विक्री संघाच्यावतीने बियाणे विक्री करण्याचा निर्णय महाबीजने घेतला होता. तथापि, तेही न झाल्याने अखेर महाबीजनेच बुधवारपासून परमीट वितरणाचे काम हाती घेतले आहे.

अनुदानावरील बियाणे शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकºयांना आता महाबीजच परमीट देत आहे. त्यामुळे शेतकºयांनी महाबीजकडून परमीट घेऊन जावे.त्यासाठी आधारकार्ड,सातबारा व जातप्रमाणपत्र अनिवार्य आहे.
बी.जी.लुले,
विभागीय व्यवस्थापक,
महाबीज, अकोला.

 

Web Title:  Two hundred and eighty thousand quintals of soyabean seed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.