रुग्णवाहिका व ट्रकच्या अपघातात दोन ठार; दोन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 20:28 IST2020-07-21T19:36:49+5:302020-07-21T20:28:06+5:30
रुग्णवाहिकेतील दोन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अकोला-वाशिम मार्गावर पातुरनजीकच्या घाटात घडली.

रुग्णवाहिका व ट्रकच्या अपघातात दोन ठार; दोन गंभीर जखमी
अकोला : भरधाव ट्रकने रुग्णवाहिकेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रुग्णवाहिकेतील दोन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अकोला-वाशिम मार्गावर पातुरनजीकच्या घाटात घडली. या अपघातात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथून एका अपघातात जखमी झालेल्या दोघांना घेऊन एम.एच. ९४ एच. ५३९ क्रमांकाची रुग्णवाहिका अकोला येथे जात होती. यावेळी विरुद्ध दिशेने येत असलेल्या एचआर ६९ बी ६६३३ क्रमांकाच्या ट्रकने पातुरच्या घाटात जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये रुग्णवाहिकेचा पार चुराडा झाला. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच पातुर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलविले.