दोन मोटारसायकलींच्या अपघातात एक ठार; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2017 02:48 AM2017-05-06T02:48:08+5:302017-05-06T02:48:08+5:30

दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक; एक जण घटनास्थळीच ठार झाला.

Two killed in a motorcycle accident; A serious | दोन मोटारसायकलींच्या अपघातात एक ठार; एक गंभीर

दोन मोटारसायकलींच्या अपघातात एक ठार; एक गंभीर

Next

बोरगाव मंजू: बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या कोठारी रस्त्यावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एक जण घटनास्थळीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ५ मेच्या रात्री घडली. तामशी येथील भानुदास रामकृष्ण राऊत (४५) हे शुक्रवारी रात्री त्यांच्या एम.एच.३0 ए.सी.६१0३ क्रमांकाच्या मोटारसायकलने तामशी येथे जात होते, तर बोरगाव मंजू येथील सुनील पगारे हे त्यांच्या एम.एच. ३0 ए.डी. ९४३ क्रमांकाच्या मोटारसायकलने बोरगावमंजूकडे येत होते. या दोन मोटारसायकलची कोठारीनजीक समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात भानुदास राऊत हे जागीच ठार झाले तर सुनील पगारे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता अकोला येथे दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पी.के. काटकर, हे. कॉ. अरुण गावंडे, लक्ष्मण आंबेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हे वृत्त लिहीपर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

Web Title: Two killed in a motorcycle accident; A serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.