ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात दाेघे जागीच ठार

By सचिन राऊत | Published: June 6, 2024 08:23 PM2024-06-06T20:23:28+5:302024-06-06T20:23:41+5:30

सिमेंट रेषेतील भेगेतून दुचाकी उसळल्याने अपघात, राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव टी पाॅइंटवरील घटना.

Two killed on the spot in a horrific accident involving a truck and two-wheeler | ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात दाेघे जागीच ठार

ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात दाेघे जागीच ठार

अकाेला : राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर राेडवरील शेगाव टी पाॅइंटजवळ ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी घडली. या अपघातात दुचाकी सिमेंट राेडवर पडलेल्या माेठया भेगेतून अचाणक उसळून ट्रकखाली गेल्याने हा अपघात झाल्याची माहीती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात भाैरद येथील दाेघे जन जागीच ठार झाले असून ट्रकचालकाविरुध्द पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवणी येथील रहिवासी शाम राजेंद्र महाले वय ३० वर्ष व उमरी परिसरातील रहीवासी सचिन जुनारे वय ३२ वर्ष हे दाेघे जण त्यांच्या दुचाकीने टाटा माेटर्स शाेरुमजवळील टी पाॅइंटवरून जात असतांना त्यांची दुचाकी सिमेंट रस्त्याच्या मध्ये असलेल्या माेठया भेगेतून उसळली आणि बाजुनेच जात असलेल्या ट्रकखाली त्यांची दुचाकी आल्याने ट्रकचालकाला समजण्याच्या आतच दाेघेही ट्रकच्या खाली आले. 

या  अपघातात दुचाकीवरील दाेघांचाही जागेवरच मृत्यू झाला. ट्रकचालकाला कळेत त्या क्षणापुर्वीच हे दाेघेही ट्रकच्या मागील टायरमध्ये आल्याचा त्यांचा मृत्यू झाल्याची माहीती घटनास्थळावरील काहींनी दिली. या अपघाताची माहीती मीळताच पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दाेघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वाेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. या अपघातामूळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून दाेन्ही युवकांचा मृत्यू त्यांच्या कुटुंबीयांसाठी माेठा आघात असल्याची माहीती आहे. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
 
सिमेंट रस्त्यामूळे उध्दवसेनेचे वारंवार आंदाेलन
शिवणी ते पीकेव्ही ते वाशिम बायपास ते रिधाेरा या सीमेंट रस्त्यावर माेठ माेठया भेगा पडल्यामूळे वाहनांचे अपघात हाेत असल्यामूळे उध्दवसेनेचे आ. नितीन देशमूख, राजेश मीश्रा यांनी वारंवार आंदाेलन करीत या भेगा पुर्णपणे बुजविण्यात याव्या अशी मागणी केली. मात्र त्यांच्या आंदाेलनाची शासनाने व बांधकाम विभागाने दखल घेतली नाही. गुरुवारी झालेल्या अपघातात दाेघे जन ठार झाल्याने या सिमेंट राेडच्या मध्ये पडलेल्या भेगाच कारणीभुत असल्याचे समाेर आले असून आता दाेषींवर कारवाइची मागणी हाेत आहे.

Web Title: Two killed on the spot in a horrific accident involving a truck and two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला