अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक : दोन ठार,एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 05:43 PM2019-07-19T17:43:06+5:302019-07-19T17:45:34+5:30

महान(अकोला) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला.

Two killed, one serious in an accident at Mahan village in Akola district | अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक : दोन ठार,एक गंभीर

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक : दोन ठार,एक गंभीर

googlenewsNext
ठळक मुद्देदिनकर भानुदास पळघणे व चंदुसिंग जाधव रा.मारखेड असे मृतकांची नावे आहेत.दुचाकी ५० ते ६० फुटापर्यंत फरफटत जाउन तिघेही रस्त्यावर फेकल्या गेले. रुग्णालयात उपचारादरम्यान दिनकर पळघणे आणि चंदुसिंग जाधव यांचा मृत्यू झाला.


महान(अकोला) : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना महान जवळ १९ जुलै रोजी दुपारी घडली. दिनकर भानुदास पळघणे व चंदुसिंग जाधव रा.मारखेड असे मृतकांची नावे आहेत.
बार्शीटाकळी तालुक्यातील मारखेड येथील दिनकर भानुदास पळघणे (३७), बाळू भानुदास पळघणे (४२) आणि चंदुसिंग जाधव (४५)हे तिघे दुचाकी क्र.एमएच ३० डब्ल्यू १३२९ ने शुक्रवारी दुपारी पिंजरवरून महानकडे येत होते. दरम्यान, महान जवळील बोथना नाल्यावर महानकडून पिंजरकडे जात असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली.ही धडक एवढी भीषण होती की दुचाकी ५० ते ६० फुटापर्यंत फरफटत जाउन तिघेही रस्त्यावर फेकल्या गेले. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महान पोलीस चौकीचे जमादार रमेश राठोड, इम्रान खान यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच संत गाडगे बाबा आपत्कालीन पथकानेही घटनास्थळावर पोहचून जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान दिनकर पळघणे आणि चंदुसिंग जाधव यांचा मृत्यू झाला. दुचाकी धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनाच्या चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पळ काढला. दरम्यान, दुचाकीस धडक देणारे वाहन प्रवाशी वाहन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.पुढील तपास महान पोलीस चौकीचे जमादार रमेश राठोड करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Two killed, one serious in an accident at Mahan village in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.