दोन लाखांवर बालकांना देणार जंतनाशक गोळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:37 AM2017-08-17T01:37:23+5:302017-08-17T01:38:02+5:30
अकोला: बालकांमधील कृमीदोष हा रक्तक्षय व कुपोषणाचे मुख्य कारण असल्यामुळे त्यांच्या आतड्यांमध्ये वाढणार्या परोपजीवींचा समूळ नाश करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जं तनाशक मोहिमेंतर्गत १८ ऑगस्ट रोजी जिल्हय़ातील (शहर व ग्रामीण) १ ते १९ या वयोगटातील बालक व किशोरवयीन मुलांना जंतनाशक गोळय़ांचे वितरण करण्या त येणार आहे. जिल्हय़ातील तब्बल २ लाख ९१ हजार ८६१ बालकांना आरोग्य विभागामार्फत अँल्बेन्डॉझॉलची गोळी देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या पाच वर्षाखालील बालकांची टक्केवारी ३४.४ टक्के आहे. तसेच १५ ते १९ वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३0 टक्के मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. यामागचे मुख्य कारण आ तड्यांमध्ये वाढणारे परोपजीवी आहेत. यासाठी राज्यात १८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हय़ात शहर व ग्रामीण भागातील २ लाख ९१ हजार ८६१ बालकांना आरोग्य विभागामार्फत अँल्बेन्डॉझॉलची गोळी देण्यात येणार आहे. सर्व आरोग्य संस्थांच्या कर्मचार्यांमार्फत सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांमध्ये गोळय़ांचे वितरण होणार आहे.
२३ ऑगस्टला मॉप-अप राउंड
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत १८ ऑगस्ट रोजी कोणताही लाभार्थी गोळी घ्यावयाचा राहिल्यास त्याला २३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार्या मॉप-अप राउंडमध्ये गोळी देण्यात येणार आहे. सदर मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखाँ पठाण, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी केले आहे.