जागतिक पर्यटन दिनावर दोन लाख विद्यार्थ्यांनी घेतली पर्यटनाची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:57 PM2019-09-29T12:57:11+5:302019-09-29T12:57:23+5:30
दोन्ही जिल्ह्यातील विविध शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना एकाच वेळी पर्यटनाची प्रतिज्ञा देण्यात आली.
अकोला-जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटनाची ओळख व्हावी,देशाटनाविषयी जनजागरण व्हावे, पर्यटनाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी अकोला,बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक विश्वात एक दिवसीय पर्यटन जनजागरण अभियान राबविण्यात आले.
पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पावस पर्यटन संस्थेच्या वतीने प्रभात किड्स, बुलडाणा येथील सहकार विद्या मंदीर येथे मुख्य कार्यक्रम घेण्यात आलेत.या दिनी दोन्ही जिल्ह्यातील विविध शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना एकाच वेळी पर्यटनाची प्रतिज्ञा देण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनास चालना देण्याची गरज व्यक्त केली होती. पर्यटनातून येणारा अनुभव जीवन समृद्ध करतो. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून प्रेरणा घेऊन पावसचे अजय सेंगर यांनी पर्यटन प्रतिज्ञा तयार केली. या संकल्पनेस अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद यांनी प्रोत्साहन देत विविध शाळांना पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन शपथ घेण्याचे आवाहन केले होते.जिल्ह्यातील विविध शाळांच्या प्रार्थना सभेत सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना पर्यटन प्रतिज्ञा देण्यात आली. बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे शाळेच्या अध्यक्षा सौ.कोमल झंवर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पर्यटन प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच प्रभात किड्स स्कूल येथे पावस टुरिझमचे संचालक अजय सेंगर यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. यावेळी प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, प्रदीपसिंह राजपूत, मनोजसिंग बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील विविध शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना पर्यटन प्रतिज्ञा देण्यात आली असून हा एक विक्रम असल्याचे मानले जात आहे.या उपक्रमाचे शैक्षणिक विश्वात सर्वत्र करण्यात येत आहे.