आठवीपर्यंतचे दोन लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:16 AM2021-04-05T04:16:40+5:302021-04-05T04:16:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : काेराेनामुळे गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइनच्या भरवशावरच झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : काेराेनामुळे गत एक वर्षापासून शाळा बंद असल्याने हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइनच्या भरवशावरच झाले. त्यामुळे मुलांचे मूल्यांकन कसे हाेणार अन् मुलांनी किती ज्ञान आत्मसात केले याबाबत पालकच चिंतित असताना शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार ५०६ विद्यार्थी विनापरीक्षा पास झाले आहेत. कोरोना पावल्याने मुले खुश आहेत; परंतु मुलांचा पुरेसा अभ्यास न झाल्याने पालक चिंतित आहेत.
शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी मूल्यांकनाचा दर्जा व मुलांची खरंच याेग्यता वाढली का, हा प्रश्नच आहे. सरसकट पास या निर्णयावर काही पालकांनी नाराजीही व्यक्त केली आहे
काय म्हणतात शिक्षणतज्ज्ञ
काेट
काेराेनाच्या उद्रेकामुळे याक्षणी तरी सरकारसमोर हा एकमेव पर्याय आहे, मात्र काेराेनानंतर आता सरकारने शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे, अन्यथा मूल्यांकन न करता विद्यार्थ्यांना पास करणे म्हणजे शाळा तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यावरही परिणाम हाेईल.
- डाॅ. संजय खडक्कार, शिक्षणतज्ज्ञ
पालक म्हणतात..
शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पूर्वीही होता. फक्त परीक्षा घेण्यात येत होत्या. यावेळी कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे परीक्षा होण्याची शक्यता नव्हती. विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार नसले तरी ऑनलाइन शिक्षणाचे मूल्यांकन किती याचे उत्तर या निर्णयामुळे अनुत्तरितच राहिले
- दीपशिखा शेगाेकार , पालक
कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यावरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या. परीक्षांमुळे किमान विद्यार्थ्यांची काय तयारी झाली हे कळते. इतर परीक्षा आफलाइन हाेत असताना सरसकट पास करणे याेग्य नाही यामुळे मुलांच्या अध्ययन क्षमतेवरच प्रश्न उपस्थित हाेऊ शकताे.
- भावना इंगळे, पालक
ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांचे योग्य शिक्षण झाले नाही हे खरे असले तरी काेराेनाच्या वाढत्या उद्रेकामुळे मुलांचे काय होईल, याबाबत चिंता सतावत होती. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने माेठा दिलासा आहे. एखादवेळ परीक्षा न हाेण्याने काही फरक पडत नाही.
- अनिरूद्ध देशपांडे , पालक
जिल्ह्यातील विद्यार्थी
वर्ग विद्यार्थी संख्या
वर्ग विद्यार्थी संख्या
पहिली २९,४१०
दुसरी २९,२४८
तिसरी २९,८७०
चाैथी ३०,१८५
पाचवी २९,६५७
सहावी २९,२८९
सातवी २८,८४७
आठवी २८,७९७
एकूण २,०६,५०६
महापलिकेच्या???????????