अकोला : रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लुबाडणारे दोघे गजाआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 08:01 PM2017-12-10T20:01:00+5:302017-12-10T20:14:38+5:30

दहीहांडा : दोन लाखांचे चार लाख करून देण्याचे आमिष दाखवून  केळीवेळीच्या एका इसमाचे १ लाख ७५ हजार रुपये घेऊन पसार होत असलेल्या  टोळीतील दोघांना दहीहांडा पोलिसांनी शुक्रवारी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ही  रक्कम जप्त केली. दोन्ही आरोपींविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात  आला.

Two looters looted to double the amount! | अकोला : रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लुबाडणारे दोघे गजाआड!

अकोला : रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून लुबाडणारे दोघे गजाआड!

Next
ठळक मुद्देचोहोट्टा येथे दहीहांडा पोलिसांची कारवाईआरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील

लोकमत न्यूज नेटवर्क
दहीहांडा : दोन लाखांचे चार लाख करून देण्याचे आमिष दाखवून  केळीवेळीच्या एका इसमाचे १ लाख ७५ हजार रुपये घेऊन पसार होत असलेल्या  टोळीतील दोघांना दहीहांडा पोलिसांनी शुक्रवारी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ही  रक्कम जप्त केली. दोन्ही आरोपींविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात  आला. आरोपींना अकोट न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना  दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली.   ही टोळी औरंगाबाद जिल्हातील असून,  अकोला येथील काही लोकांच्या मदतीने दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून  लोकांना लुबाडत होते. 
केळीवेळी येथील गजानन महादेव शिवरकार यांच्या एका मित्राने सांगितले, की आ पल्याकडे पैसे दुप्पट करून देणारी माणसे आहेत. शिवरकार यांचा मोह  वाढल्याने  त्यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार शुक्रवारी पैसे देण्याचे ठरले. या टोळी तील चौघे जण एका कारने चोहोट्टा बाजार येथे आले. त्यातील विजय बोरसे,  (३७) रा. श्रीरामपूर जि. औरंगाबाद आणि अजीज याकुब कासकरे (५६) रा.  काजली जि. औरंगाबाद हे केळीवेळी येथील गजानन शिवरकार यांच्या घरी गेले.   शिवरकार यांच्याकडे १ लाख ७५ हजार रुपयेच होते. या रकमेचे दुप्पट करण्यास  त्या दोघांनी नकार दिला. तडजोडीनंतर सायंकाळी ही रक्कम दुप्पट करण्यास दोघेही  तयार झाले. त्यांनी शिवरकार यांना चोहोट्टा बाजार येथे चालण्याविषयी सांगितले.  शिवरकार यांनी ही रक्कम घरातील कपाटात ठेवली. घराचे इतर दरवाजे बंद  करण्यासाठी शिवरकार गेले असता, या दोन्ही चोरट्यांनी कपाटातील १ लाख ७५  हजार रुपयांची रक्कम लंपास केली. तेथून तिघेही दुचाकीने चोहोट्टा बाजार येथे  निघाले. चोहोट्टा बाजार येथून काही अंतरावर दोघेही दुचाकीवरून खाली उतरले.  ते दोघेही एका कारमध्ये बसत असल्याचे शिवरकार यांना दिसले. त्यांना आपली  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कारचा पाठलाग केला व चोहोट्टा  बाजार येथे कारला अडवले. यातील एकाबरोबर त्यांची हाणामारी झाली. हा प्रकार  तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी पाहिल्याने त्यांनी दोघांनाही पोलीस स्टेशनला  आणले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

Web Title: Two looters looted to double the amount!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.