दोन महिने उलटले; पण हरभऱ्याचे मिळाले नाही चुकारे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 01:12 PM2019-05-26T13:12:58+5:302019-05-26T13:13:03+5:30
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आधीच संकटात सापडला असताना, हरभºयाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- संतोष येलकर
अकोला : जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रांवर नाफेडमार्फत २५ मेपर्यंत १ हजार २ शेतकऱ्यांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभरा विकल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र विकलेल्या हरभºयाचे चुकारे अद्याप शेतकºयांना मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आधीच संकटात सापडला असताना, हरभºयाचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यात १५ मार्चपासून नाफेडमार्फत हमीदराने हरभरा खरेदी सुरू करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील पारस, तेल्हारा, बाळापूर व पातूर या चार खरेदी केंद्रांवर २५ मेपर्यंत १ हजार २ शेतकºयांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभरा खरेदी सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला; मात्र विकलेल्या हरभºयाचे चुकारे अद्याप मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत आधीच शेतकरी संकटात सापडला असताना येत्या खरीप हंगामातील पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्यातच विकलेल्या हरभºयाचे चुकारे अद्याप मिळाले नसल्याने, शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने विकलेल्या हरभºयाचे हक्काचे पैसे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
सात कोटींचे चुकारे प्रलंबित;
मिळाले अडीच कोटी!
चार खरेदी केंद्रांवर १ हजार २ शेतकºयांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापोटी ६ कोटी ९६ लाख रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत. प्रलंबित चुकाºयाच्या रकमेपैकी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी ‘नाफेड’मार्फत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. अडीच कोटी रुपयांचे चुकारे अदा करण्यात येणार असले तरी उर्वरित चुकाºयापोटी ४ कोटी ८९ लाख रुपयांची रक्कम नाफेडकडून केव्हा प्राप्त होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाफेडमार्फत हरभरा खरेदीत जिल्ह्यातील चार खरेदी केंद्रांवर आतापर्यंत १ हजार २ शेतकºयांकडून २७ हजार ९२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापोटी एकूण ६ कोटी ९६ लाख रुपयांपैकी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी नाफेडकडून प्राप्त झाला. उपलब्ध रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. हरभरा खरेदीच्या सर्व चुकाºयाची रक्कम महिन्याभरात शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
-एच. एल. पवार,
जिल्हा मार्केटिंग अधिकारी.