रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार करणारे आणखी दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:19 AM2021-04-27T04:19:47+5:302021-04-27T04:19:47+5:30

अकोला : कोरोनाच्या भीषण संकटामुळे अनेकांचे जीव जात असताना यावर उपाय म्हणून असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत ...

Two more arrested for blackmailing remedivir injection | रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार करणारे आणखी दोघे अटकेत

रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार करणारे आणखी दोघे अटकेत

Next

अकोला : कोरोनाच्या भीषण संकटामुळे अनेकांचे जीव जात असताना यावर उपाय म्हणून असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असताना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी पाच जणांना अटक केली. या पाच आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून बिहाडे हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफ असलेल्या एका महिलेसह एका वॉर्ड बॉयला स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. सोनल फ्रान्सिस मुजमुले व भाग्येश प्रभाकर राऊत, असे आरोपींची नावे आहेत.

रामनगरातील एका मेडिकल स्टोअर्समधून कोरोनावर काही प्रमाणात उपायकारक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी सापळा रचून, तसेच बनावट ग्राहकाद्वारे या गौरखधंद्यातील आरोपी आशिष समाधान मते याच्याकडून बिना देयक, प्रिस्क्रिप्शनशिवाय रेमडेसिविर हे इंजेक्शन चार हजार रुपयांचे असताना तब्बल २५ हजार रुपयांमध्ये विक्री करीत असताना त्याला ताब्यात घेतले. त्याच्या माहितीवरून रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात विक्री करणारे त्याचे साथीदार राहुल गजानन बंड, वय २६ वर्षे, राहणार भारती प्लॉट, जुने शहर, सचिन हिंमत दामोदर, वय ३० वर्षे, राहणार अशोकनगर, अकोट फाइल, प्रतीक सुरेश शहा, राहणार रामनगर व अजय राजेश आगरकर, वय २५ वर्षे, राहणार बाळापूर नाका यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचही आरोपींना अटक केली. या पाच आरोपींनी दिलेल्या माहितीवरून बिहाडे केअर सेंटर तथा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्थान असलेल्या सोनल फ्रान्सिस मुजमुले, वय २७ वर्षे, राहणार लहरियानगर कौलखेड व भाग्येश प्रभाकर राऊत, वय 29 वर्षे, राहणार इंजिनिअरिंग कॉलनी मोठी उमरी या दोघांना सोमवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात औषधी व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, औषधे किंमत नियंत्रण अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियम या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ७ आरोपींकडून तीन रेमडेसिविर इंजेक्शन, तसेच एक लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

डॉक्टर बिहाडे यांची चौकशी

रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणात बिहाडे हॉस्पिटलमधील दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बिहाडे यांची चौकशी करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने हॉस्पिटल संचालकांची चौकशी केली असून, आणखी काही बड्या आरोपींची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Two more arrested for blackmailing remedivir injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.