अकोल्यात कोरोनाचे आणखी दोन बळी, ५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:18 AM2021-02-10T04:18:32+5:302021-02-10T04:18:32+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २५८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर आणि अकोट येथील प्रत्येकी आठ, डाबकी रोड, मोठी उमरी, तोष्णीवाल ले-आउट येथील प्रत्येकी चार, बाभुळगाव, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन, सहकारनगर, केडीया प्लॉट, हिवरखेड येथील प्रत्येकी दोन, राऊतवाडी, बार्शीटाकळी, कलालची चाळ, गुडधी, तापडीयानगर, गोडबोले प्लॉट, न्यू तापडीयानगर, पातूर, जुने शहर, कैलास टेकडी, न्यू भागवत प्लॉट, जवाहरनगर, गंगानगर, सिव्हिल लाइन, गीतानगर, बोरगाव मंजू, जीएमसी, निंभोरा, ओम सोसायटी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
महिला व पुरुषाचा मृत्यू
मंगळवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये कापशी येथील एका ६७ वर्षीय महिला व सुकळी ता. बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दोघांना अनुक्रमे १ व ६ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
८६७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,९२१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,७१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ८६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.