अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०० नवे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 03:31 PM2021-02-20T15:31:38+5:302021-02-20T15:31:46+5:30

CoronaVirus News आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५० झाली आहे.

Two more death in Akola district, 200 new corona positive | अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०० नवे कोरोना पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०० नवे कोरोना पॉझिटिव्ह

googlenewsNext

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून, शनिवार, २० फेब्रुवारी रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३५० झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १७३, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये २७ अशा एकूण २०० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १३,५९३ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६६२ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४८९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील २३, जीएमसी येथील १२, कौलखेड येथील १०, डाबकी रोड येथील नऊ, विरवाडा ता.मुर्तिजापूर येथील आठ, भारती प्लॉट, गोरक्षण रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी सहा, दगडी पुल, खडकी व लखनवाडा येथील प्रत्येकी पाच, रामदासपेठ येथील चार, मलकापूर येथील तीन, व्हीबीएच कॉलनी,तुकाराम चौक, खडकी, धोगा, मोठी उमरी, जवाहर नगर, गायगाव, सूधीर कॉलनी, घुसर, मनकर्णा प्लॉट, गड्डम प्लॉट व खदान येथील प्रत्येकी दोन, व्यंकटेश नगर, कोठारी नगर, अशोक नगर, कलमेश्वर, रजपुतपूरा, पोलिस हेडक्वॉटर, अकोट फैल, स्वराज्य भवन, कान्हेरी सरप, जीएमसी हॉस्टेल, तापडीया नगर, नवरंग सोसायटी, गंगाधर प्लॉट, किर्ती नगर, न्यु राधाकिसन प्लॉट, कॉग्रेस नगर, गंगा नगर, तोष्णीवाल लेआऊट, बोरगाव मंजू, रवी नगर, विद्या नगर, अपोती, खोलेश्वर, वानखडे नगर, आश्रय नगर, केडीया प्लॉट, देवरावबाबा चाळ, शिवनगर, हाजी नगर, हरिहर पेठ, रतनलाल प्लॉट, पवन वाटीका, अकोली, जूने शहर, उमरी, मोरेश्वर कॉलनी, डोंगरगाव, गीता नगर, हिवरखेड, शिवाजी नगर, कोठारी वाटीका, एसबीआय कॉलनी, दहिहांडा, गायत्री नगर, शास्त्री नगर, पिंजर व पार्वती नगर येथील प्रत्येकी एक असे १७३ पॉझिटिव्ह आहेत.

 

दोन महिलांचा मृत्यू

शनिवारी कृषि नगर, खदान येथील ३० वर्षीय महिला आणि विजय हाऊसिंग कॉलनी येथील ७३ वर्षीय महिला अशा दोन कोविडबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दोघींनाही अनुक्रमे १७ आणि ९ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

रॅपिड चाचण्यांमध्ये २७ पॉझिटिव्ह

शुक्रवार १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या १५१ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये २७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. आतपर्यंत झालेल्या एकूण ३३,६५६ चाचण्यांमध्ये २३४८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

 

१,८२२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३,५९३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,४२१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३५० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत १,८२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Two more death in Akola district, 200 new corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.