आणखी दोघांचा मृत्यू, २१४ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:33 AM2021-02-18T04:33:30+5:302021-02-18T04:33:30+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५६२ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५६२ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३८८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जीएमसी येथील २६, मूर्तिजापूर येथील १९, अकोट व जठारपेठ येथील प्रत्येकी सहा, गोरक्षण रोड, डाबकी रोड, चतुर्भुज कॉलनी व हिंगणा रोड येथील प्रत्येकी पाच, सिधी कॅम्प, रेणुका नगर, लहान उमरी, तोष्णीवाल लेआऊट व तुकाराम चौक येथील प्रत्येकी चार, रामदासपेठ, आदर्श कॉलनी व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन, रणपिसे नगर, मोठी उमरी, आश्रय नगर, लक्ष्मी नगर, बार्शिटाकळी व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन, तारफैल, पिंपरी खुर्द ता.अकोट, राधाकिसन प्लॉट, कौलखेड, संतोष नगर, मलकापूर, जीएसी क्वॉटर, बाळापूर, सातव चौक, मालीपुरा, उमरी, जयहिंद चौक, दीपक चौक, सराफा बाजार, जवाहर नगर, गीता नगर, टिटवा, रिधोरा, मोमिनपूरा, विठ्ठल नगर, दुर्गा चौक, पिंपलसिंगे, वाशिम बायपास, गोविद नगर, राऊतवाडी, विद्या नगर, स्नेहा नगर, तापडीया नगर, कापशी, चोहट्टा बाजार, गड्डम प्लॉट, खडकी, अकोट फैल, बाळापूर रोड, हिवरखेड ता.तेल्हारा, विद्युत कॉलनी, मराठा कॉलनी, आळसी प्लॉट, राम नगर, बिर्ला कॉलनी, गिरी नगर, न्यु तापडीया नगर व खडकी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी मूर्तिजापूर येथील पाच, बाळापूर येथील चार, जीएमसी येथील दोन, पळशी बु. ता. बाळापूर व पातूर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दोन पुरुष दगावले
बुधवारी अडगाव खुर्द ता. अकोट येथील ७१ वर्षीय पुरुष व मूर्तिजापूर येथील ७० वर्षीय पुरुष अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला. दोघांना अनुक्रमे ९ व ११ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
४९ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १८, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून चार, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले १९ अशा एकूण ४९ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
१,१९४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,८७८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,३८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,१९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.