आणखी दोघांचा मृत्यू, २४७ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:19 AM2021-03-10T04:19:33+5:302021-03-10T04:19:33+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६०८ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६०८ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४५५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील ३०, मूर्तिजापूर येथील २१, मोठी उमरी व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, खडकी व शिवनगर येथील प्रत्येकी चार, आदर्श कॉलनी, जुने शहर, न्यू तापडीया नगर व पंचशील नगर प्रत्येकी तीन, मुंडगाव, डाबकी रोड, रजपूतपुरा, रामदासपेठ, मारोती नगर, काँग्रेस नगर, लहान उमरी, मलकापूर, कौलखेड, गोरक्षण रोड, पोलीस क्वॉर्टर, पिंपळगाव, वाशिम बायपास, सिंधी कॅम्प, सिरसो, गजानन नगर व हिंगणा रोड प्रत्येकी दोन, तर रुईखेड, सिरसोली, वडाळी सटवाई, जऊळका, अकोली जहागीर, शिवणी, संभाजी नगर, खदान, नानक नगर, गीता नगर, निमवाडी, लक्ष्मी नगर, कसूरा, भारती प्लॉट, माळा नगर, शास्त्री नगर, न्यू खेतान नगर, वाडेगाव, देशमुख फैल, तुकाराम चौक, बाळापूर रोड, रणपिसे नगर, माळीपुरा, आपातापा रोड, न्यू राधाकिसन प्लॉट, राहुल नगर, अकोट फैल, जीएमसी, शिवाजी नगर, दताळा, बोरगाव खुर्द, गोडबोले प्लॉट, चहाचा कारखाना, शिवसेना वसाहत, हरिहर पेठ, खैर मोहमद प्लॉट, व्हीएचबी कॉलनी व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.
महिला व पुरुषाचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या सांगवी बाजार ता. अकोला येथील ६५ वर्षीय महिला व शास्त्री नगर, अकोला येथील ४५ वर्षीय पुरुष अशा दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला. या दोघांना अनुक्रमे ३ व १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
४,९८३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९,४८० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १४,१०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३८८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,९८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.