आणखी दोघांचा मृत्यू, २४८ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:19 AM2021-03-16T04:19:12+5:302021-03-16T04:19:12+5:30
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१२ तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ३६ अशा एकूण २४८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ...
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१२ तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ३६ अशा एकूण २४८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २१,८४७ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५८७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३७५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील १४, मोठी उमरी येथील ११, गोरक्षण रोड व मलकापूर येथील आठ, रणपिसे नगर व जीएमसी येथील प्रत्येकी सात, डाबकी रोड येथील सहा, सहकारनगर येथील पाच, न्यू राधाकिसन प्लॉट, कौलखेड, खेडकरनगर, रतनलाल प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी चार, शिवनगर, बाळापूर, गणेशनगर, हिंगणा रोड, रजपूतपुरा, अकोट, लहरियानगर, सोमथाना व शिवणी येथील प्रत्येकी तीन, खडकी, आनंदनगर, पातूर, आळशी प्लॉट, तापडियानगर, जुने शहर, इंदिरानगर, आदर्श कॉलनी, गांधी रोड, गुडधी, अनिकट, शिवसेना वसाहत, खोलेश्वर, माणिक टॉकीज, अंबर न्यायधीस निवारा, राऊतवाडी, मूर्तिजापूर, कैलास टेकडी, संतोषनगर व अनंतनगर येथील प्रत्येकी दोन, भीमनगर, कोठारी वाटिका, शिवाजीनगर, संग्रामपूर, पत्रकार कॉलनी, कृषिनगर, शास्त्रीनगर, बिर्ला कॉलनी, बार्शीटाकळी, न्यू भीमनगर, देशमुख फैल, स्वालंबीनगर, जीएमसी क्वॉटर, गांधीनगर, परिवार कॉलनी, माणिक टॉकीज, टेलिफोन कॉलनी, एमआयडीसी, मोमीनपुरा, तारफैल, शास्त्रीनगर, वाशिंबा, म्हाडा कॉलनी, वाशिम बायपास, खरप रोड, तोष्णीवाल लेआऊट, आंबेडकर चौक, शंकरनगर, दुर्गानगर, मोहाळी सांगवी, चोहट्टा बाजार, शंकरनगर, गांधी रोड, कृषिनगर, पारस, उमरी, जठारपेठ, गायत्रीनगर, तिलक रोड, गंगाधर प्लॉट, केशवनगर, जुने आरटीओ, महात्मा फुलेनगर, मुलानी चौक, तुकाराम चौक, माधवनगर, गाडगेनगर, सांगवी बाजार, ज्ञानेश्वरनगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, गणेश नगर, रामदासपेठ, दुर्गा चौक, भारती प्लॉट, मालीपुरा, गायगाव, संत कवर नगर व बाभूळगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
महिला व पुरुषाचा मृत्यू
म्हातोडी, ता. अकोला येथील ७० वर्षीय महिला व गुलजारपुरा, अकोला येथील ८२ वर्षीय पुरुष अशा दोन कोरोनाबाधित रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे ९ मार्च व १४ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
३३४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४०, ओझोन हॉस्पिटल येथील पाच, युनिक हॉस्पिटल येथून दोन, नवजीवन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, हेंडज कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथील १४, उपजिल्हा आरोग्य मूर्तिजापूर येथील तीन, आयुर्वेदिक महाविद्यालयातून १२, तर होम आयसोलेशन येथील २५० अशा एकूण ३३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
५,०९६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१,८४७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १६,३४७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४०४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,०९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.