आणखी दोघांचा मृत्यू, २५६ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:19 AM2021-04-01T04:19:34+5:302021-04-01T04:19:34+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९१८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९१जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७८१ ...

Two more died, 256 new positive | आणखी दोघांचा मृत्यू, २५६ नवे पॉझिटिव्ह

आणखी दोघांचा मृत्यू, २५६ नवे पॉझिटिव्ह

Next

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९१८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९१जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७८१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मलकापूर येथील सात, जठारपेठ येथील पाच, मोठी उमरी व केशव नगर येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड, रामदासपेठ व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, उरळ, अकोट, देवरी, पारस, न्यू तापडिया नगर, लहान उमरी, निबंधे प्लॉट, जुने शहर, राऊतवाडी, जीएमसी, तोष्णीवाल ले-आऊट, राम नगर व शिवणी येथील प्रत्येकी दोन, कृषी नगर, खंडाळा, एमआयडीसी, मिर्झापूर, भौरद, मनारखेड, शेळद, कादवी, देशमुख फैल, बिर्ला राम मंदिर, रामगाव, गजानन नगर, डाबकी रोड, सांगळूद, कोठारी वाटिका, बार्शीटाकळी, तुकाराम चौक, कौलखेड, टॉवर चौक, पारस, हिंगणा रोड, आदर्श कॉलनी, विजय नगर, शंकर नगर, पातूर, तारफैल, घुसर, अयोध्या नगर, आयुर्वेदिक कॉलज, सिव्हिल लाईन, निंभा ता.मूर्तिजापूर, शिवापूर, खडकी, बालाजी नगर, राधाकृष्ण टॉकीज व कुंभारी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सायंकाळी बार्शीटाकळी येथील पाच, डाबकी रोड येथील चार, तारफैल येथील तीन, तुकाराम चौक व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, म्हैसपूर, प्रतीकनगर, आसरा कॉलनी, पंचशील नगर, आगर, तेल्हारा, बाळापूर, शिवणी, अनिकट, खोलेश्वर, नवरंग सोसायटी, गोरक्षण रोड, आळशी प्लॉट, शिवनगर, रजपूतपुरा, मोठी उमरी, अयोध्या नगर, गंगा नगर, विजय नगर, गोकूल कॉलनी, शिवाजी पार्क, दुर्गा चौक, तोष्णीवाल ले-आऊट, रतनलाल प्लॉट, अंभोरा, गणेश नगर, समता नगर, पळसोळा, माना व राहित येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

दोघांचा मृत्यू

कोरोनावर उपचार सुरू असलेल्या बोलके प्लॉट, अकोट येथील ७० वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. त्यांना २२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी व्दारका नगरी, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास २३ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.

७८९ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३५, सहारा हॉस्पिटल येथील तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार, बिहाडे हॉस्पिटल येथील पाच, युनिक हॉस्पिटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, खैर उम्मीद हॉस्पिटल सोनोरी मुर्तिजापूर येथे दोन, हारमोनी हॉस्पिटल येथील दोन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील तीन, आधार हॉस्पिटल मुर्तिजापूर येथील तीन, बाॅईज हॉस्टेल अकोला येथील आठ, नवजीवन हॉस्पिटल येथील पाच, ओझोन हॉस्पिटल येथील पाच, आयुर्वेदिक महाविद्यालयातून १७, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, इंद्रा हॉस्पिटल येथील तीन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील आठ, अवघाते हॉस्पिटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील ६७१ अशा एकूण ७८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

५,७८४ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,७०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २०,४६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४५२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,७८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Two more died, 256 new positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.