आणखी दोघांचा मृत्यू; ३१ नवे पॉझिटिव्ह, १५ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:59+5:302020-12-06T04:19:59+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी २९१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर उर्वरित २६६ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी २९१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत, तर उर्वरित २६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कौलखेड येथील चार, राम नगर व गजानन नगर डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन, तर लक्ष्मी नगर, पातूर, डाबकी रोड, काँग्रेस नगर, आदर्श कॉलनी, तोष्णीवाल लेआऊट, सिंधी नगर, पारस, बपोरी ता. मूर्तिजापूर, उमरा ता. पातूर, साष्टी ता. पातूर, तुलंगा ता. पातूर, बार्शीटाकली, बाजोरिया नगर, छोटी उमरी, कैलास टेकडी निमवाडी व कवर नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
महिला व पुरुषाचा मृत्यू
शनिवारी दोघांचा मृत्यू झाला. पंचशील नगर येथील ७२ वर्षीय पुरुष व अकोट तालुक्यातील धारेल येथील ६५ वर्षीय महिला या दोघांचा मृत्यू झाला. दोघांना अनुक्रमे २७ व २८ नोव्हेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
रॅपिड चाचण्यांमध्ये सहा पॉझिटिव्ह
शनिवारी दिवसभरात झालेल्या २२८ चाचण्यांमध्ये केवळ सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत २६०६२ चाचण्यांमध्ये १८१९ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
१५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, अकोला ॲक्सिडेंट क्लिनिक येथून एक तर बिऱ्हाडे हॉस्पिटल येथून तीन, अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६४० अॅक्टिव्ह ‘पॉझिटिव्ह’
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९,६३२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८,६९४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २९८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६४० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.