आणखी दोघांचा मृत्यू, ४०७ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:33 AM2021-03-04T04:33:01+5:302021-03-04T04:33:01+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८७० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८७० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५२८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील ३५, पातूर येथील १७, एमआयडीसी येथील १४, बाळापूर येथील १२, गोरक्षण रोड, झुरल बु., डोंगरगाव व उगवा येथील प्रत्येकी पाच, पारस व उरल खु. येथील प्रत्येकी चार, गुडधी, हिवरखेड व गाडेगाव येथील प्रत्येकी तीन, टेलिफोन कॉलनी, गजानन पेठ, आगीखेड ता. पातूर, भरतपूर, खेडकर नगर व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, सुधीर कॉलनी, वडद, अकोट, आकाशवाणी, विद्युत कॉलनी, अयोध्या नगर, अंतरी, मोरझाडी, वाडेगाव, जवाहरनगर, शास्त्रीनगर, अनिकेत, शिवणी, मोठी उमरी, आरएमओ हॉस्टेल, घुसर, बोरगाव मंजू, दोनद बु., डाबकी रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी मुर्तिजापूर येथील ४२, पातूर येथील १८, मोठी उमरी येथील नऊ, बोर्डी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी आठ, कौलखेड, गौरक्षण रोड व रामनगर येथील प्रत्येकी सहा, कापसी येथील पाच, छोटी उमरी, मलकापूर, जीएमसी, शास्त्रीनगर, सुधीर कॉलनी, हरीहरपेठ येथील प्रत्येकी चार, राऊतवाडी, तुकाराम चौक, कुरणखेड, डाबकी रोड व माधवनगर येथील प्रत्येकी तीन, विवेकानंद कॉलनी, रणपिसे नगर, वाशिम बायपास, टॉवर चौक, ज्योती नगर, जवाहर नगर, मोरेश्वर कॉलनी, खडकी व अकोट येथील प्रत्येकी दोन, नवरंग सोयायटी, गजानन पेठ, लक्ष्मी नगर, खोलेश्वर, जयहिंद चौक, शिवणी, मारोती नगर, रेल्वे कॉलनी, राम नगर, बाळापूर रोड, गीता नगर, जुने शहर, देशमुख फैल, बाळापूर नाका, हनवडी, बाळापूर, निमवाडी, तोष्णीवाल लेआऊट, नायगाव, श्रीनाथ सोयायटी, व्हीएचबी कॉलनी, काँग्रेस नगर, ओझोन हॉस्पिटल, जलतारे प्लॉट, गोरेगाव, त्रिमूर्ती नगर, जठारपेठ, तापडीया नगर, अंबिका नगर व भीम नगर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
महिला व पुरुषाचा मत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या शिवनी येथील ५८ वर्षीय महिला व राजेश नगर, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष अशा दोन रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे २५ व १८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
३१२ जणांना डिस्चार्ज
दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५१, हॉटेल स्कायलार्क येथील १०, आयुर्वेदिक महाविद्यालयातून ३९, बिहाडे हॉस्पिटल येथील सात, ओझोन हॉस्पिटल येथील दोन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील एक, आयकॉन हॉस्पिटल येथील एक, हॉटेल रिजेन्सी येथील चार, अवघाते हॉस्पिटल येथील पाच, युनिक हॉस्पिटल येथील पाच, आधार हॉस्पिटल मूर्तिजापूर येथील एक, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील सहा, हेंडज कोविड केअर सेंटर मूर्तिजापूर येथील २७, तर होम आयसोलेशन येथील १५३, अशा एकूण ३१२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३,७५७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७,०१५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १२,८८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३७२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३,७५७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.