अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २०९ जण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:22 PM2021-02-25T16:22:23+5:302021-02-25T16:57:12+5:30
CornaVirus in Akola आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६१ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, गुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६१ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १६७, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ४२ अशा एकूण २०९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १५,०१२ वर पोहोचली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६२५ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४५८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मुर्तिजापूर येथील १३, अकोट येथील ११, कौलखेड येथील १०,तेल्हारा येथील नऊ, जठारपेठ येथील आठ, गौरक्षण रोड येथील सात, सिंधी कॅम्प येथील पाच, जीएमसी, जूने शहर, जवाहर नगर, तापडीया नगर, मलकापूर व पातूर येथील प्रत्येकी चार, शास्त्री नगर, डाबकी रोड, भौरद, केतन नगर व जूने राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पोपटखेड, रामदासपेठ, गीता नगर, मोठी उमरी, पैलपाडा, लहान उमरी, मलकापूर, खेलदेशपांडे, राऊतवाडी, खरप व इनकम टॅक्स येथील प्रत्येकी दोन, गोकूल कॉलनी, अनिकेत, शिवाजी नगर, खडकी, तारफैल, महसूल कॉलनी, दिवेकर चौक, बाळापूर, आळसी प्लॉट, बायपास, वृदावन नगर, जामठी बु., लक्ष्मी नगर, निपान, खदान, देवर्डा, परीवार कॉलनी, गायत्री नगर, आंबेडकर नगर, किर्ती नगर, शालीनी टॉकीज, पाटील मार्केट, वृंदावन नगर, आदर्श कॉलनी, व्हीएबी कॉलनी, सुधीर कॉलनी, गुडधी, पत्रकार कॉलनी, रतनलाल प्लॉट, पंचायत समिती, गोडबोले प्लॉट, आनंद नगर, गुलजार पुरा, दिपक चौक, केशव नगर, शिवाजी नगर, हरिहरपेठ, नरसिंगपूर, उंबरखेड, व्याळा, हिवरखेड, हिंगणा बु., व घोडेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रुग्ण आहेत.
१५ वर्षीय मुलगी व वृद्धाचा मृत्यू
गुरुवारी कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये पातूर येथील १५ वर्षीय मुलगी व अकोला शहरातील ८६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दोघांनाही अुक्रमे २३ व २४ फेब्रुवारी रोजी उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
२,८७० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५,०१२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,७८१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३६१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत २,८७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.