अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २३३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:49 PM2021-04-06T12:49:30+5:302021-04-06T12:49:41+5:30

Corona Cases in Akola : आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४७६ झाला आहे.

Two more killed in Akola district, 233 corona positive | अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २३३ कोरोना पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, २३३ कोरोना पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, ६ एप्रिल रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४७६ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १२९, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १०४ अशा एकूण २३३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित होणाऱ्याची संख्या २९,२६७ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९६५ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८४६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील नऊ, महागाव बु., जठारपेठ, मलकापूर, कौलखेड व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी पाच, मोठी उमरी, लहान उमरी, गुडदी रोड येथील प्रत्येकी चार, जुने शहर, सिंधी कॅम्प, खोलेश्वर, राऊतवाडी, सुकोडा, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन, चिखलगाव,दक्षतानगर, हिंगणा रोड, वाशीम बायपास, डाबकी रोड, पीकेव्ही क्वार्टर, खडकी, गजानन नगर, बाळापूर,जीएमसी आणि दाताळा येथील प्रत्येकी दोन तर अंतरी, मांजरी, राधेनगर, बेलखेड, गोरक्षण रोड, शंकरनगर, नकाशी, कीर्तीनगर, खीरपूरी खु., मोहम्मद अली रोड, माधवनगर, सेलूबाजार, जवाहर नगर, गंगानगर, सुधीर कॉलनी, मनकर्णा प्लॉट, रेल, तुकाराम चौक, मुकुंद नगर, सस्ती, आलेगाव, टिळकरोड, तोष्णिवाल लेआऊट, गायत्री नगर, रुईखेड, दानापुर, चोहोट्टा, डेवडा, उरळ, केशवनगर, न्यू खेतान नगर, पहूरजिरा, रणपिसेनगर, हातगाव, लंघापूर, कंजरा, माना, शिवनी, मनबदा, गीतानगर, पारस, चतारी, बोरगाव मंजू येथिल प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

 

दोघांचा मृत्यू

देवरावबाबा चाळ, अकोला येथील ६३ वर्षीय महिला व डाबकी रोड येथील ६२ वर्षीय पुरुष या दोघांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे ५ एप्रिल व २७ मार्च रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

४,१८८ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९,२६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांपैकी तब्बल २४,६०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४७६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,१८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Two more killed in Akola district, 233 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.