अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, ३४५ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 07:48 PM2021-03-11T19:48:09+5:302021-03-11T19:52:24+5:30
CoronaVirus News गुरुवार, ११ मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३९३ वर गेला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवार, ११ मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३९३ वर गेला आहे. आररटीपीसीआर चाचण्यांमध्ये २७६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६९ अशा एकूण ३४५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २०,२३६ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,५१८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २७६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,९७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जीएमसी येथील २५, मुर्तिजापूर येथील १५, अंबुजा पारस येथील नऊ, डाबकी रोड व हरिहर पेठ येथील प्रत्येकी आठ, जूने शहर येथील सात, मलकापूर, कौलखेड, खडकी व सहकार नगर येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी, रजपूतपुरा, बार्शीटाकळी, बाळापूर व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्यकी चार, गजानन नगर, जठारपेठ, अनिकेत, बाळापूर नाका व अखातवाडी येथील प्रत्येकी तीन, खदान, हनुमान वस्ती, खोलेश्वर, पिंपळखुटा, विजय हाऊसिंग, गंगा नगर, तुकाराम चौक, अकोट फैल, शिवनगर, न्यु तापडीया नगर, आळसी, गोरक्षण रोड, रामदासपेठ, सुधीर कॉलनी, निमवाडी, शिवर, भौरद, अकोट व बोरगाव मंजू येथील प्रत्येकी दोन, चवरे प्लॉट, दुर्गा चौक, मुभी नगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, कैलास टेकडी, संतोष नगर, गिरी नगर, अंबिका नगर, ओम हाऊसिंग, माधव नगर, मराठा नगर, ज्ञानेश्वरी नगरी, रुख्मिनी नगर, जयहिंद चौक, पंचशील नगर, बाळापूर रोड, रेणूका नगर, दगडीपूल, मोहता मिल, मूंकूद नगर, सिव्हील लाईन, गौसरवाडी, रणपिसे नगर,अमनपूर, कृषी नगर, गिरी नगर, महमूद नगर, पोलिस हेडक्वॉटर, आनंद नगर, गांधी नगर, बायपास रोड,गीता नगर, गड्डम प्लॉट, लोकमान्य नगर, शंकरविरा, नकाशी, राऊतवाडी, मोहम्मद अली रोड, वानखडे नगर, न्यु भिम नगर, वरोडी, चिखलगाव, सावरा, प्रतिक नगर, ग्रीनलँड कॉटेजजवळ, बिर्ला रोड, तेल्हारा, तापडीयानगर, आरएलटी, लाडीस फैल, अकोट फैल, गुलजारपुरा, चोहट्टा बाजार, खोबरखेड, सातव चौक, घुसर व पळसो बढे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी डाबकी रोड येथील नऊ, शिवणी येथील पाच, राम नगर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, शास्त्रीनगर, खोलेश्वर व जूने शहर येथील प्रत्येकी दोन, गोकूल कॉलनी, जीएमसी, एसबीआय कॉलनी, अडगाव, केशव नगर, राजीव गांधी नगर, सिंधी कॅम्प, शिवसेना वसाहत, रामदासपेठ, टीएचओ ऑफीस, बक्षी हॉस्पीटल, रतनलाल चौक, मोठी उमरी, महान, रणपिसे नगर, मलकापूर, न्यु बैद्यपूरा, पोला चौक, मालीपूरा, देवरावबाबाची चाळ, अकोट फैल, रतनलाल प्लॉट व तेल्हारा येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दोन पुरुषांचा मृत्यू
सांयकाळी खाजगी रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये गोरक्षण रोड येथील ४६ वर्षीय पुरुष व पिंपळखुटा ता. बार्शिटाकळी येथील ४४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. या दोघांनाही अनुक्रमे २६ फेब्रुवारी व ४ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
३३१ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३०, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून सात, नवजीवन हॉस्पीटल येथून एक,कोवड केअर सेंटर समाज कल्याण हॉस्टेल येथून १५, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथील ३२, सहारा हॉस्पीटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातून १०, तर होम आयसोलेशन येथील २२५ अशा एकूण ३३१ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४,८४९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २०,२३६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १४,९९४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३९३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,८४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.