आणखी दोन बळी, २६६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:16 AM2021-04-05T04:16:56+5:302021-04-05T04:16:56+5:30
सायंकाळी अकोट येथील १५, पारस व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, खानापूर वेस ता.अकोट येथील दोन, जुना अंदुरा, ...
सायंकाळी अकोट येथील १५, पारस व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, खानापूर वेस ता.अकोट येथील दोन, जुना अंदुरा, रौंदळा, न्यु तापडीया नगर, राधाकिसन प्लॉट, गड्डम प्लॉट, रतनलाल प्लॉट, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, माना, गायत्री नगर, आपातापा रोड,जूना आळसी प्लॉट, शाहनूर ता.अकोट, चिंचपानी ता.अकोट व आसेगाव ता.अकोट येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दोन पुरुषांचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या पारस येथील ५९ वर्षीय पुरुषाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांना २९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी मुर्तिजापूर येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.त्यांना १ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.
६४३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, सहारा हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील चार, देवसार हॉस्पीटल येथील एक, नवजीवन हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील दोन, समाज कल्याण हॉस्टेल येथील २५, आयकॉन हॉस्पिटल येथील दोन, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पिटल येथील आठ, ओझोन हॉस्पिटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील तीन तर होम आयसोलेशन येथील ५७० अशा एकूण ६४३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४,३३६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८,८३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांपैकी तब्बल २४,०२५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४७० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,३३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.