आणखी दोन बळी, ३१ पॉझिटिव्ह, ४१ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:17 AM2021-01-17T04:17:07+5:302021-01-17T04:17:07+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३९० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३९० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३६१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये गोरक्षण रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प व पूर्वा काॅम्पलेक्स येथील प्रत्येकी दोन, तर पिंजर, ता. बार्शिटाकळी, अकोट, डाबकी रोड, जुने शहर, तरोडा कसबा, ता. बाळापूर, आदर्श कॉलनी, बलवंत कॉलनी, शिवाजीनगर, जिल्हा परिषद कॉलनी, दीपक चौक, राऊतवाडी, सुधीर कॉलनी, कौलखेड, रतनलाल प्लॉट, आनंदनगर, हिंगणा रोड, राजेश्वर मंदिर, नयागाव व हिंगणा रोड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
खदान व अकोट येथील दोघांचा मृत्यू
शनिवारी आरोग्यनगर, खदान येथील ६० वर्षीय पुरुष व अकोट येथील ५२ वर्षीय या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे १ जानेवारी व १३ जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
४१ जणांना डिस्चार्ज
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २७ अशा एकूण ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६११ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,१२० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,१८० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.