आणखी दोन बळी, ३११ नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 03:20 PM2021-03-18T15:20:58+5:302021-03-18T15:22:10+5:30
Cornavirus News गुरुवार, १८ मार्च रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ४१५ झाला आहे.
अकोला :जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे सत्र सुरूच असून, गुरुवार, १८ मार्च रोजी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ४१५ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३६ तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ७५ अशा एकूण ३११ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २३,०१९ वर पोहोचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११९० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९५४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तुकाराम चौक येथील २०, डाबकी रोड येथील १२, पातूर व लहान उमरी येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी आठ, मलकापूर, हरहिर पेठ व बाळापूर येथील प्रत्येकी सहा, तेल्हारा, मोठी उमरी, खदान, बार्शीटाकळी, व्याळा, कुंभारी, अकोट फैल, जामठा व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, बोरगाव मंजू, खडकी, अनिकट, पुनोती बु., व्हिएचबी कॉलनी, पिंपळगाव, हाता, जूने शहर व शिवण खुर्द येथील प्रत्येकी तीन, राम नगर, जठारपेठ, अडगाव, गिरी नगर, आदर्श कॉलनी, गाडगे नगर, न्यु राधाकिसन प्लॉट, पिंपळोद, सिंधी कॅम्प, आनंद नगर, पोलिस क्वॉटर, जितापूर व एडंली येथील प्रत्येकी दोन, जीएमसी हॉस्टेल, महाकाली नगर, चावरे प्लॉट, रणपिसे नगर, शिवणी, आळशी प्लॉट, खंगरपुरा, बंजारा नगर, गायत्री नगर, काजळेश्वर, धोडगा, महान, सोपीनाथ पेठ, भिम नगर, अयोध्या नगर, चांदखॉ प्लॉट, लोकमान्य नगर, अपोती खुर्द, माळीपुरा, न्य भागवत प्लॉट, शिवर, पोळा चौक, रेणुका नगर, न्यु तापडीया नगर, कृषी नगर, तापडीयानगर, गड्डम प्लॉट, उरळ बु., नया अंदुरा, वाशिम बायपास, राधाकिसन प्लॉट, चिखलगाव, टेलीफोन कॉलनी, आपातापा, शिवसेना वसाहत, मनोरा, शिवाजी पार्क, खोलेश्वर, निमकर्दा, गंगा नगर, गांधी रोड, खैर मोहम्मद प्लॉट, बालाजी नगर, गीता नगर, जयहिंद चौक, शेलार प्लॉट, आलेगाव, दानापूर, वडगाव रोठे, तारफैल, पळसोबढे, अकोट, आझाद कॉलनी, इंदिरा कॉलनी, हिवरखेड, रवीनगर, रिंग रोड, माधव नगर, केशव नगर, मुर्तिजापूर, अंत्री बाळापूर, वाडेगाव व मुंडगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
दोन पुरुषांचा मृत्यू
उरळ ता. बाळापूर येथील ५० वर्षीय पुरुष व माना ता.मुर्तिजापूर येथील ५८ वर्षीय पुरुष अशा दोन कोरोनाबाधित रुग्णांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे १५ व ९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
५,३४९ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २३,०१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १७,२५५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४१५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,३४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.