CoronaVirus : दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी दोघांनी अकोटात ठोकला होता मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:35 AM2020-04-03T10:35:15+5:302020-04-03T10:38:42+5:30

दोघांनी तेथून परतल्यानंतर अकोट शहरात मुक्काम ठोकला होता, अशी धक्कादायक माहीती २ एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली आहे.

The two participants in the Delhi event had stayed at Akot | CoronaVirus : दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी दोघांनी अकोटात ठोकला होता मुक्काम

CoronaVirus : दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी दोघांनी अकोटात ठोकला होता मुक्काम

Next
ठळक मुद्देदिल्ली येथील धार्मिक संमेलनामध्ये राज्यभरातील लोक सहभागी झाले होते. अकोट शहरातील एका नगर मध्ये राहणारा एक तर दुसरा अकोला येथुन अकोट मध्ये एका चौकात घर असलेल्या सासरवाडीत मुक्काम ठोकुन होता.या दोंघांना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात रेफर करण्यात आले असुन त्यांचा चाचणी अहवालअद्याप येणे बाकी आहे.
-
िजय शिंदेअकोट: राजधानी दिल्लीत गत महीन्यात पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेकडो जणांपैकी दोघांनी तेथून परतल्यानंतर अकोट शहरात मुक्काम ठोकला होता, अशी धक्कादायक माहीती २ एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली आहे. प्रशासनाने अशा दोंघाना हुडकून काढले असुन त्यांची अकोट ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक चाचणी करून अकोला रेफर केले आहे. या दोघांचा संपर्क झाल्याची ठिकाणे शोधुन जंतुनाशक फवारणी व आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.दिल्ली येथील धार्मिक संमेलनामध्ये राज्यभरातील लोक सहभागी झाले होते. यापैकी अकोट शहरातील एका नगर मध्ये राहणारा एक तर दुसरा अकोला येथुन अकोट मध्ये एका चौकात घर असलेल्या सासरवाडीत मुक्काम ठोकुन होता. या दोंघानीही अकोट शहरात कसा प्रवेश घेतला हा प्रश्न अनुत्तरित आहे. या दोंघाचाही शोध लागला असुन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या दोंघांना अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात रेफर करण्यात आले असुन त्यांचा चाचणी अहवालअद्याप येणे बाकी आहे. दरम्यान या कार्यक्रमाला देशभरातुन उपस्थितांपैकी अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. अकोट शहरात दोंघाचा मुक्काम उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमाला अकोट येथून कोण गेले होते, याची माहीती स्थानिक पोलीसांकडे नव्हती. तसेच या कार्यक्रमाला कोणीच हजेरी लावली नसुन शहरात कोणी परतले नसल्याची माहीती संबंधितांनी प्रशासनाला दिली होती. दरम्यान, अकोट शहरात महसुल विभाग व नगरपरिषद प्रारंभीपासून युध्दपातळीवर जनजागृती करीत आहे. शहरात दाखल झालेल्यांची तपासण्या करण्यात आल्या असुन, एकही संशयित आढळला नाही.

Web Title: The two participants in the Delhi event had stayed at Akot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.