अकोल्यात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळले
By admin | Published: March 25, 2017 02:02 AM2017-03-25T02:02:49+5:302017-03-25T02:02:49+5:30
खासगी रुग्णालयात उपचार सुरू.
अकोला, दि. २४- वातावरणातील बदलाने जिल्ह्यात आजारांचे प्रमाण वाढले असतानाच आता स्वाइन फ्लू या जीवघेण्या आजाराने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लूचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर शहरातील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.
यापैकी एक रुग्ण अमरावती येथील असून, त्याला १३ मार्च रोजी येथे दाखल करण्यात आले. सदर रुग्ण हा पोलीस दलातील असल्याची माहिती आहे. दुसरा रुग्ण (४८) हा अकोला शहरातील नानक नगर, निमवाडी परिसरातील असून, त्याला २१ मार्च रोजी दाखल करण्यात आले. दोघांचेही नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते. तपासणी अहवाल प्राप्त झाला असून, दोघेही स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात नमूद आहे. दोन्ही रुग्णांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास कळविण्यात आली आहे. रुग्ण आढळून आलेल्या भागात सर्वेक्षण व इतर उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.