अकोल्यातील २ पोलीस अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 03:39 AM2020-02-29T03:39:13+5:302020-02-29T03:39:24+5:30

हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; अनिल देशमुखांचा इशारा

two police officers in akola suspended for laxity in work | अकोल्यातील २ पोलीस अधिकारी निलंबित

अकोल्यातील २ पोलीस अधिकारी निलंबित

Next

मुंबई : अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणात अकोला येथील सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी भानुप्रताप मडावी आणि प्रणिता कराडे यांना निलंबित करण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली. महिला व मुलींविषयक गुन्ह्यांच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला.

अल्पवयीन मुलगी हरविल्याची नोंद मुलीच्या पालकांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात नोंदविली होती. मात्र या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी गतीने तपास केला नाही. पालकांना योग्य वागणूक किंवा उत्तरे दिली नाहीत. तसेच तपासाबाबत आश्वस्त केले नाही. मुलीच्या काळजीमुळे पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने तपासातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करून कडक शब्दात ताशेरे ओढले. शुक्रवारी या मुलीच्या पालकांनी मंत्रालयात अनिल देशमुख यांना भेटून मुलीच्या तपासाबाबत विनंती केली. त्यावर देशमुख यांनी विभागाच्या अपर मुख्य सचिवांना बोलावून चर्चा केली.

Web Title: two police officers in akola suspended for laxity in work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस