यापूर्वी जीएमसीत आग लागल्याच्या दोन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:44 AM2021-01-13T04:44:50+5:302021-01-13T04:44:50+5:30
२९ नोव्हेंबर २०१९ रोजी वॉर्ड क्र. २३ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. वॉर्ड क्रमांक २३ ला लागूनच नवजात शिशूंचा ...
२९ नोव्हेंबर २०१९ रोजी वॉर्ड क्र. २३ मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती.
वॉर्ड क्रमांक २३ ला लागूनच नवजात शिशूंचा एसएनसीयू कक्ष आहे.
डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे ही आग विझविण्यात आली होती.
त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दुसरी घटना
२६ जून २०२० रोजी जीएमसी परिसरातील वसतिगृहाच्या मीटर रूममध्ये आग लागली होती.
ही आगदेखील मीटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागली होती.
अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला होता.
ही धक्कादायक माहिती आली समोर!
जीएमसीच्या एकाच इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित, इतर इमारतींची यंत्रणा अपुरी
नवीन इमारतीमध्ये फायर फायटिंग इन्स्टॉलेशनची अग्निशमन विभागाला माहितीच नाही.
इन्स्टॉलेशन झालेल्या अग्निशमन यंत्रणेची पाण्याची टाकी कोरडीच.
अग्निशमन सिलिंडर आहेत, पण तेही अपुरे.
२०१२ पासून फक्त पत्रव्यवहार, प्रत्यक्षात कृती नाहीच.
जबाबदारी कुणाची?
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनच जीएमसी आणि जिल्हा स्री रुग्णालयातील कामे केली जातात. त्यानुसार, जीएमसी प्रशासन व जिल्हा स्री रुग्णालय प्रशासनामार्फत फायर ऑडिट आणि ‘फायर फायटिंग ॲन्ड डिटेक्टर सिस्टीम’ कार्यान्वित करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. वारंवार पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही प्रकरणे अडकली आहेत. दुसरीकडे मनपाच्या अग्निशमन विभागाकडूनही ना हरकत प्रमाणपत्रासंदर्भात केवळ पत्रव्यवहार होताना दिसून येतो. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करणे आणि त्याचे फायर ऑडिट करण्याची जबाबदारी कुणाची, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.