लोहारा येथील दगडफेकीत दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 05:43 PM2020-03-17T17:43:26+5:302020-03-17T17:43:33+5:30

लोहारा येथील नवीन प्लाट भागात जुन्या वादातून दोन गटात वाद झाला.

Two seriously injured in stone pelting at Lohara | लोहारा येथील दगडफेकीत दोन गंभीर जखमी

लोहारा येथील दगडफेकीत दोन गंभीर जखमी

Next

लोहारा/ उरळ : जुन्या वादातून येथील नवीन प्लॉटमध्ये दोन गटात सोमवारी रात्री वाद झाला. या वादातून दोन्ही गटांच्या लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामध्ये दोन्ही गटांचे दोन जण गंभीर तर सात जण किरकोळ जखमी झाले. अर्धा तास दगडफेक सुरू असल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटाच्या १९ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ९ जणांना अटक करण्यात आली आहे. गावात चोख बंदोबस्त लावण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. १७ मार्च रोजी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, एसडीपीओ रोहिणी साळुंखे आदींनी लोहारा येथे भेट देऊन शांततेचे आवाहन केले.
लोहारा येथील नवीन प्लाट भागात जुन्या वादातून दोन गटात वाद झाला. या वादातून दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. दगडफेकप्रकरणी अ. रहीम अ. रहेमान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी नीलेश सुभाष घावट, रवी गजानन रायबोये, सुभाष लक्षुमण वावरे, संजय वासुदेव वावरे, मंगेश सुभाष घावट, शिवदास उत्तम वाघ, महादेव नारायण वावरे, राजू शंकर मालटे, पवन उत्तम वाघ यांच्या विरुद्ध भादंवि कलम ३३४ ब, ४५२, ३२५, ३२४, ५०४, ३३६, ३४३, १४५, १४७, १४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या गटाच्या गजानन निनाजी मालटे यांच्या फिर्यादीवरून आयफाज नईम देशमुख, ताजमोहम्मद बिस्मिल्ला देशमुख, रहीम बने मिया देशमुख, जावेद बाशीत देशमुख, अ. रहीम अ. रहमान देशमुख, हबीब ईसा मिया देशमुख, अक्कू पटेल, रहीम मुनाफ पटेल, अर्शद मुनाफ देशमुख, यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३२३, १४३, १४४, १४७, १४८, १४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील ९ जणांना उरळ पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. दंगलीची माहिती मिळताच बाळापूर पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी साळुंके तसेच उरळ ठाण्याचे उपनिरीक्षक किशोर मवसकार, स्थानिक गुन्हे शाखेचे शैलेश सपकाळ आदींनी गावात भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. गावात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Two seriously injured in stone pelting at Lohara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.