अकोल्यात नायलॉन मांजामुळे कापल्याने दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 05:02 PM2019-01-15T17:02:17+5:302019-01-15T17:03:43+5:30

अकोला : बंदी असल्यानंतरही अकोल्यात चीनी व नॉयलान मांजाची धडाक्याची विक्री सुरु असून, या मांजामुळे कापल्याने दोन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी घडली.

Two siriously injured due to china manja in Akola | अकोल्यात नायलॉन मांजामुळे कापल्याने दोघे जखमी

अकोल्यात नायलॉन मांजामुळे कापल्याने दोघे जखमी

googlenewsNext

अकोला : बंदी असल्यानंतरही अकोल्यात चीनी व नॉयलान मांजाची धडाक्याची विक्री सुरु असून, या मांजामुळे कापल्याने दोन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी मकर संक्रांतीच्या दिवशी घडली. रिझवान पोहावाला आणि शेख कासम शेख हुसेन (६२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
पशू-पक्ष्यांसह मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी आणि नायलॉन मांजाच्या विक्रीला राज्य सरकारने बंदी घातली आहे. ही बंदी झुगारू न नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक करतात. मकर संक्रांतीनिमित्त मंगळवारी अकोला शहरात पतंगबाजीला उधान आले होते. घरांच्या गच्चीवर व मोकळ्या जागेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत पतंग उडविण्यात मग्न होते. दरम्यान, शिवणी परिसरात राहणारे शेख कासम शेख हुसेन हे सकाळी ११ वाजता आपल्या कामावर जात असताना मलकापूर येथे मांजामुळे त्यांचा चेहरा कापल्या गेला. तसेच हाताची बोटेही मांजामुळे कापल्या गेली. नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांच्या चेहºयावरील जखमेला २१ टाचे दिले, तर बोटांना ११ टाचे पडले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दुसºया घटनेत रिझवाना पोहावाला हे त्यांच्या एम.एच. ३० ए. यू. ४२२० क्रमांकाच्या मोटारसायकलने नविन किराणा मार्केट मधील आपल्या दुकानात जात असताना वाशिम बायपास मार्गावरील मानव मोटर्स समोर पतंग उडविणाºयांचा मांजा त्यांच्या चेहºयात अडकला व ते मोटार सायकलवरून खाली पडले. यामुळे त्यांचा चेहरा व डोळ्याच्यावरचा भाग कापल्या गेला. त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आहे.



नॉयलॉन मांजावरील बंदी कागदावरच
नागरिकांना चालताना किंवा वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन रस्त्याने जावे लागते. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी किंवा प्रसंगी मृत्युमुखी पडतात. मांजावर बंदी घालण्याची सूचना न्यायलायाने सरकारला केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने १९८६ पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी आहे. बंदी असूनही चिनी व नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याचे या दोन घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: Two siriously injured due to china manja in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.