विठ्ठल भक्तांसाठी धावणार दोन विशेष रेल्वे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:57 PM2018-07-11T13:57:29+5:302018-07-11T13:59:39+5:30
अकोला : भुसावळ सेंट्रल रेल्वे विभागाच्यावतीने विठ्ठल भक्तांसाठी दोन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
अकोला : भुसावळ सेंट्रल रेल्वे विभागाच्यावतीने विठ्ठल भक्तांसाठी दोन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अमरावती ते पंढरपूर आणि खामगाव ते पंढरपूर अशा दोन रेल्वे गाड्या धावणार असून, १७ आणि २४ जुलै दरम्यान या रेल्वेगाड्या सेवा देणार आहेत.
अमरावती ते पंढरपूर ही रेल्वेगाडी १७ आणि २० जुलै तर खामगाव ते पंढरपूर १८ आणि २१ जुलै रोजी सोडल्या जाणार आहे. या दोन्ही रेल्वेगाड्या परतीच्या प्रवासालादेखील राहतील. पंढरपूर ते अमरावती १८ आणि २४ जुलै रोजी तर पंढरपूर ते खामगाव या रेल्वेगाड्या १९ आणि २५जुलै रोजी धावणार आहेत. या दोन्ही विशेष रेल्वे गाड्यांचे बडनेरा, मूर्तिजापूर,अकोला,शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड,जळगाव, पाचोरा, चाळीसगाव,नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड,भिगवन,जेऊर आणि पंढरपूर येथे थांबा घेईल. खामगावहून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांनाही हेच थांबे राहतील, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने क ळविण्यात आले आहे.