नांदेड़-हजरत निजामुद्दीन दरम्यान दोन विशेष रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 07:05 PM2021-03-22T19:05:09+5:302021-03-22T19:05:24+5:30
special trains between Nanded-Hazrat Nizamuddin या गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावर थांबा असल्याने उत्तर भारतात जाणार्या अकोलेकरांची सोय झाली आहे.
अकोला : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने २५ मार्चपासून नांदेड़ ते हजरत निजामुद्दीन दरम्यान दोन उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना अकोला रेल्वेस्थानकावर थांबा असल्याने उत्तर भारतात जाणार्या अकोलेकरांची सोय झाली आहे.
मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनूसार, ०४०३८ डाऊन उत्सव विशेष हजरत निजामुद्दीन-नांदेड ही गाडी हजरत निजामुद्दीन येथून २५ मार्च आणि १ एप्रिल रोजी २३.१५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी २१.४० वाजता नांदेड़ ला पोहोचेल. गाडी क्रमांक ०४०३७ अप उत्सव विशेष नांदेड़-हजरत निजामुद्दीन ही गाडी नांदेड येथून २७ मार्च आणि दिनांक ३ एप्रील रोजी ११.०५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी १०.१० वाजता हजरत निजामुद्दीन ला पोहोचेल.
या गाडीला पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला,लकापूर, खंडवा, इटारसी, हबीबगंज, भोपाल, बीना, झांसी,ग्वालियर,आग्रा,मथुरा या ठिाकणी थांबा असणार आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.