अजमेर उर्स उत्सवाकरिता अकोलामार्गे दोन विशेष रेल्वे
By Atul.jaiswal | Published: January 7, 2024 02:23 PM2024-01-07T14:23:56+5:302024-01-07T14:24:11+5:30
दक्षीण मध्य रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, ०७१२५ हैदराबाद-अजमेर विशेष गाडी सोमवारी
अकोला : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजस्थान राज्यातील अजमेर येथे आयोजित ८१२ उर्स उत्सवाकरीता भाविकांची होणार असलेली गर्दी लक्षात घेता दक्षीण मध्य रेल्वेने हैदराबाद व काचीगुडा येथून अजमेर व मदार जंक्शनकरीता विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला रवाना होऊन २० जानेवारीला परत येणार असलेल्या दोन रेल्वे गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर भाविकांची सोय होणार आहे.
दक्षीण मध्य रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, ०७१२५ हैदराबाद-अजमेर विशेष गाडी सोमवार, १५ जानेवारी रोजी हैदराबाद येथून १५:०० वाजता रवाना होऊन बुधवार, १७ जानेवारी रोजी सकाळी ०८:३० वाजता अजमेर स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी मंगळवार, १६ जानेवारी रोजी ०३:०५ अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात ०७१२६ अजमेर-हैदराबाद विशेष गाडी शनिवार, २० जानेवारी रोजी अजमेर येथून ०५:३० वाजता सुटेल व रविवार,२१ जानेवारी रोजी हैदराबाद येथे १५:३० वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर रविवारी ०३:२० वाजता येणार आहे.
काचीगुडा-मदार-काचीगुडा विशेष
०७१२९ काचीगुडा- मदार विशेष गाडी सोमवार, १५ जानेवारीला काचीगुडा वरून २३:४५ वाजता सुटेल व बुधवार १७ जानेवारी रोजी मदारला १७:४५ वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर मंगळवार, १६ जानेवारी रोजी १३:०५ वाजता येणार आहे. परतीच्या प्रवासात ०७१३० मदार -काचीगुडा विशेष गाडी शनिवार २० जानेवारीला मदार वरून १:४० वाजता सुटेल व सोमवारी काचीगुडाला सकाळी ०४:३० वाजता पोहचेल.