स्वाइन फ्लूचे दोन संशयित रुग्ण
By admin | Published: July 15, 2017 01:39 AM2017-07-15T01:39:58+5:302017-07-15T01:39:58+5:30
अकोला : स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजाराने अकोल्यात पुन्हा डोके वर काढले आहे. सर्वोपचार रुग्णालयात या आजाराचे आणखी दोन संशयित रुग्ण दाखल झाल्याची माहिती शुक्रवारी समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजाराने अकोल्यात पुन्हा डोके वर काढले आहे. सर्वोपचार रुग्णालयात या आजाराचे आणखी दोन संशयित रुग्ण दाखल झाल्याची माहिती शुक्रवारी समोर आली.
अकोल्यात मार्च व एप्रिल महिन्यांमध्ये स्वाइन फ्लू ने थैमान घातले होते. पाच रुग्णांचा बळी घेतल्यानंतर या रोगाची साथ ओसरली. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा या जीवघेण्या आजाराने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या दोन रुग्णांना गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एक रुग्ण वाशिम जिल्ह्यातील आहे, तर दुसरा रुग्ण अकोला जिल्ह्यातील आहे. दोघांनाही स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी असलेल्या विशेष कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर टॅमी फ्लू उपचार सुरू करण्यात आले आहेत. दोघांच्याही घशातील स्वॉब नमुने घेण्यात आले असून, तपासणीसाठी ते नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतर त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे किंवा नाही, हे स्पष्ट होईल, असे उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सांगितले.