विजयनगरात दोन तलवारी जप्त

By admin | Published: June 17, 2016 02:42 AM2016-06-17T02:42:32+5:302016-06-17T02:42:32+5:30

रामदास पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान दोन तलवारी जप्त करण्यात आला.

Two swords seized in Vijaynagar | विजयनगरात दोन तलवारी जप्त

विजयनगरात दोन तलवारी जप्त

Next

अकोला: रामदासपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान विजय नगरातील दोघांकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत निगराणी बदमाशांच्या घरांची झडती घेतली. झडतीदरम्यान विजय नगरात राहणारे भारत श्याम खरे, पिया श्याम खरे या दोघांच्या घरांमध्ये तलवारी ठेवल्या असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून तलवारी जप्त केल्या आणि दोघांना अटक केली. तसेच २२ मार्च रोजी सहा महिन्यांसाठी तडीपार केलेला आरोपी शंकर कसावा हा शहरातच असल्याची रामदासपेठ पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली.

Web Title: Two swords seized in Vijaynagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.