दोन हजाराच्या नोटा पुन्हा चलनातून होताहेत कमी
By admin | Published: April 4, 2017 01:32 AM2017-04-04T01:32:33+5:302017-04-04T01:32:33+5:30
रिझर्व्ह बँकेकडे पाठविला राष्ट्रीयीकृत बँकांनी अहवाल
अकोला: हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाबंदीनंतर कॅशलेसचे प्रमाण वाढेल, अशी शक्यता होती; मात्र दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्यात. काही दिवस आर्थिक व्यवहार करताना, अनेकांनी आॅनलाइन आणि पॉस मशीनचा वापर केला; मात्र अशा व्यवहारांकडे आता धनदांडग्यापासून तर मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वांनीच पाठ फिरविली. ज्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेकडून दोन हजाराच्या नोटा दाखल झाल्यात त्या तुलनेत चलनात येणे बंद झाले आहे. तसा अहवाल राष्ट्रीयीकृत बँकांकडून रिझर्व्ह बँकेकडे पाठविला गेला आहे.
बनावट नोटा पकडण्यासाठी आणि काळा पैसा चलनात आणण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आणली गेली. बंदी येताच मोठ्या प्रमाणात लोकांनी बँक, पेट्रोलपंप आणि औषधी दुकानात नोटा चालविल्यात. रिझर्व्ह बँकेला अपेक्षेप्रमाणे हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा प्राप्त झाल्या; नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारास चालना मिळावी म्हणून पेट्रोल-डिझेलच्या खरेदीच्या प्रतिलीटर खरेदीवर ०.७ टक्के सूट दिली गेली. अनेकांना त्याचा लाभ मिळाला आणि अजूनही मिळतो आहे; मात्र ग्राहक आता पुन्हा रोख व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र या व्यवहारांमध्ये नोटांची संख्या अपेक्षेप्रमाणे नसल्याने नागरीक नोटा जमा करून ठेवत असल्याचे समोर आले आहे. ही बाब राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवहारात अधोरेखित होताच त्यांनी तसा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे पाठविला आहे.
दहाचा क्वाइन नाकारणे गुन्हा
अलीकडे बाजारात आणि दैनंदिन व्यवहारात दहा रुपयांचा क्वाइन नाकारला जातो आहे. कोणतेही कारण नसताना दहा रुपयांचा क्वाइन नाकारणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय मुद्रेचा अवमान करणेप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो. व्यवहारात तसे कोणी करीत असेल तर तक्रार करा, असे मतही अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गायकवाड यांनी व्यक्त केले.
नोटा दाबून ठेवण्याची मानसिकता नागरिकांच्या डोक्यातून जायला तयार नाही. त्यामुळे पुन्हा नोटा डम होत आहेत. अशा प्रकारामुळे देशाचे आणि बँकांचे चलन कमजोर होते. बँकांच्या दैनंदिन उलाढालीच्या नोंदीत मोठ्या नोटा थांबत असल्याचे अधोरेखित झाले आहे.
-तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला.