बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात होणार दोन हजार रुपये जमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:04 AM2020-04-19T11:04:11+5:302020-04-19T11:04:19+5:30
११ हजार बांधकाम मजुरांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत जमा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाउन’मध्ये इमारतींची बांधकामे बंद पडल्याने बांधकाम मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत जमा करण्याचा निर्णय शासनामार्फत शनिवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील नोंदणीकृ त व सक्रिय ११ हजार बांधकाम मजुरांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत जमा होणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आले आहे. ‘लॉकडाउन’च्या कालावधीत इमारतींची बांधकामे बंद पडल्याने बांधकाम मजुरांच्या हाताला काम नाही. रोजगार मिळत नसल्याने बांधकाम मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
या पृष्ठभूमीवर ‘लॉकडाउन’च्या कालावधीत जीवनातील दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे आर्थिक मदत जमा करण्याचा निर्णय शासनाच्या कामगार विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नोंदणीकृ त कार्यरत ११ हजार बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे आर्थिक मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
नोंदणीकृ त व सक्रिय कार्यरत बांधकाम मजुरांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्याचा निर्णय शासनाच्या कामगार विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नोंदणीकृ त व कार्यरत ११ हजार बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात येणार आहे. मदतीची रक्कम थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा होणार असल्याने त्यासाठी कोणताही अर्ज करण्याची किंवा कोणाशीही संपर्क साधण्याची गरज नाही.
-राजू गुल्हाने, सहायक कामगार आयुक्त, अकोला.
‘लॉकडाउन’मध्ये जिल्ह्यातील बांधकाम मजुरांच्या हाताला काम नसल्याने बांधकाम मजुरांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकाम मजुरांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत जमा करण्याचा निर्णय शासनामार्फत जाहीर करण्यात आला आहे; परंतु मदतीची ही रक्कम अत्यल्प असून, बांधकाम मजुरांना प्रत्येकी किमान ५ हजार रुपयांची मदत मिळणे गरजेचे आहे.
-शैलेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, बांधकाम बिल्डिंग पेंटर्स असोसिएशन.