एकाच विद्यार्थिनीला दुसऱ्यांदा शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:32 PM2018-12-04T12:32:26+5:302018-12-04T12:33:33+5:30
अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून २०१७-१८ मध्ये देय असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम खात्यावर जमा करताना दोन विद्यार्थिंनीऐवजी एकीच्या नावावर दुसºयांदा देण्यात आली.
अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून २०१७-१८ मध्ये देय असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम खात्यावर जमा करताना दोन विद्यार्थिंनीऐवजी एकीच्या नावावर दुसºयांदा देण्यात आली. मार्च २०१८ मध्ये घडलेल्या या प्रकाराने एक विद्यार्थिनी शिष्यवृत्तीपासून अद्यापही वंचित आहे. समाजकल्याण विभागात डुलक्या घेणाºया अधिकारी-कर्मचाºयांनी विद्यार्थिनीचे पालक चौकशीसाठी गेले असता त्यांचीच कौटुंबिक चौकशी करण्याची भाषाही वापरली आहे.
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा देण्यासाठी २०१६-१७ पासून स्वाधार योजना सुरू झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. अकोला जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करताना समाजकल्याण विभागाने डुलक्या घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. एका लाभार्थीला ४५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ती रक्कम एकाच विद्यार्थिनीच्या नावावर दोन वेळा म्हणजे ९० हजार रुपये जमा करण्यात आली. एंजल आॅफ मर्सी इस्टिट्युट आॅफ नर्सिंग सायन्स येथे प्रशिक्षण घेणाºया राजश्री राजेश वानखडे या विद्यार्थिनीची ४५ हजार रुपये रक्कम दुसºया विद्यार्थिनीच्या नावावर टाकली. ती मात्र अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित आहे. याबाबत चौकशीसाठी पालकांनी सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांना तुम्ही पात्र लाभार्थी आहात की नाही, याचीच चौकशी करावी लागेल, असा दम देण्यास अधिकारी विसरले नाहीत.
चूक करणाºयाला घातले पाठिशी
स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थिनीच्या नावे जमा करण्याची जबाबदारी असलेल्या वसतिगृह अधीक्षक चेडे यांना या प्रकरणात पाठीशी घातले जात आहे. सहा महिन्यांपासून या चुकीची दुरुस्ती करण्याचीही तसदी समाजकल्याण विभागाने घेतली नाही. दाद मागायला गेलेल्या पालकांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यातून चूक करणाºया संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला.
विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना नोटीस
याप्रकरणी श्री नथमल गोयनका विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना नोटीस देत मनीषा दिवाकर इंगळे या विद्यार्थिनीकडून ४५ हजार रुपये वसूल करून ती धनाकर्षाद्वारे समाजकल्याण कार्यालयात जमा करण्याची नोटीस सहायक आयुक्तांनी दिली. या प्रक्रियेत सोयीस्करपणे ही गंभीर चूक करणाºया संबंधित कर्मचाºयांना बाजूला ठेवण्यात आले आहे. त्यांना नोटीस देत विचारणा करण्याचेही धाडस सहायक आयुक्तांनी दाखवले नाही, हे विशेष.