दोन ट्रकच्या अपघातात दोन्ही चालक ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:35 PM2019-03-01T13:35:27+5:302019-03-01T13:35:44+5:30

कुरूम: राष्ट्रीय महामार्गावरील कुरूम गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर जबर धडक झाली. यात दोन्ही ट्रकचे चालक ठार झाले. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.

 Two trucks accident; two drivers killed | दोन ट्रकच्या अपघातात दोन्ही चालक ठार!

दोन ट्रकच्या अपघातात दोन्ही चालक ठार!

Next

कुरूम: राष्ट्रीय महामार्गावरील कुरूम गावाजवळ दोन ट्रकची समोरासमोर जबर धडक झाली. यात दोन्ही ट्रकचे चालक ठार झाले. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात माना पोलिसांनी दोन्ही चालकांसह ट्रकच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पंचदमिया वैशाली (बिहार) येथील प्रकाशकुमार अशोककुमार महतो (२0) याच्या तक्रारीनुसार अमरावतीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एमएच ३३-४३६८ क्रमांकाचा ट्रकचालक राकेश लालाजी चौव्हान (२८ रा. मन मवई उत्तर प्रदेश) याने डब्लू बी ११ डी- ९४१ क्रमांकाच्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातामध्ये ट्रकचालक रमनकुमार जोगेश्वर रॉय (३0 रा. किरदरपूर बिहार) हा जागीच ठार झाला. रमनकुमार हा कोलकाता येथून डाक पार्सल घेऊन धुळ्याकडे जात होता; परंतु दरम्यान त्याच्या ट्रकच्या अपघात झाला. सोबतच ट्रकचालक राकेश चौहान हा ट्रकमध्ये फसल्यामुळे त्याचे दोन्ही पाय तुटले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अमरावती येथील रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान राकेशचा मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. माना पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी एमएच ३३-४३६८ क्रमांकाचा ट्रकचालकावर व मालकावर कलम ६५ एई ८१, ८३, १0८ महाराष्ट्र प्रोव्हीशन अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. पीएसआय श्रीकृष्ण पाटील, एएसआय प्रदीप उमक, कर्मचारी दिलीप नागोलकर, नंदकिशोर टिकार, विजय मानकर, नीलेश इंगळे, सचिन दुबे, संदीप पवार, शशिकांत इंगळे तपास करीत आहेत.

एका ट्रकमध्ये ११ लाख रुपयांच्या दारूचा साठा!
एमएच ३३-४३६८ क्रमांकाच्या ट्रकमधील कॅबिनच्या मागे असलेल्या एका कप्प्यामध्ये देशी दारूचे ३८५ बॉक्स, ६00 फुटलेल्या दारूच्या बाटल्यांसह देशी दारूच्या शेकडो बाटल्या आढळून आल्या. या दारूची ट्रकसह किंमत ११ लाख रुपये आहे. शासनाचा महसूल बुडवून दारूची अवैध वाहतूक करण्यात येत होती. दारूबंदी निरीक्षक संजय देशमुख यांनी ट्रकची पाहणी करून त्यातील दारू अवैध असल्याचे स्पष्ट केले.

 

Web Title:  Two trucks accident; two drivers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.