राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची अमोरासमोर धडक; चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 10:18 AM2021-01-05T10:18:12+5:302021-01-05T16:19:36+5:30

Truck Accident दोन ट्रकचा अमोरासमोर अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली. 

Two trucks collide on National Highway; Driver killed | राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची अमोरासमोर धडक; चालक ठार

राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची अमोरासमोर धडक; चालक ठार

Next
ठळक मुद्देआयशर चालक केबिनमध्ये फसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातानंतर सदर आयशर ट्रकने पेट घेतला होता. राष्ट्रीय महामार्गावरील काही तासासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.

 मूर्तिजापूर : ग्रामिण पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अनभोरा बस थांब्या नजीक दोन ट्रकचा अमोरासमोर अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली.  गोविंद विश्राम पाल (रा. नागपूर) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.
 अमरावती कडून अकोला कडे आयशर ट्रक क्रमांक एम.एच.१२ एल.टी.७७३६ हा जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या  ट्रक क्रमांक एम.एच.३२ एजे,३३५५ याने आयशर ट्रकला समोरून जोरदार धडक दिल्याने आयशर चालक केबिनमध्ये फसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर सदर आयशर ट्रकने पेट घेतला होता, ग्रामस्थांनी धाव घेऊन सदर आग आटोक्यात आणली. येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दोन तासांच्या परिश्रमानंतर केबिन तोडून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले, दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील काही तासासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीसांनी ती सुरळीत केली. एमएच ३२ एजे ३३५५ च्या चालकाविरुद्ध भरधाव व निष्काळजी वाहन चावल्याने कलम २७९, ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे पोलीस शिपाई अनिल अहेरवाल करीत आहे.

Web Title: Two trucks collide on National Highway; Driver killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.