पातूर-बाळापूर महामार्गावर ट्रकची दुचाकीस धडक: युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:26 PM2019-03-19T18:26:16+5:302019-03-19T18:26:22+5:30
पातूर(अकोला): भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार झाला. ही घटना १९ मार्च रोजी दुपारी पातूर-बाळापूर महामार्गावर घडली. योगेश आनंदराव वसतकार रा. चरणगाव असे मृतक युवकाचे नाव आहे.
पातूर(अकोला): भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक ठार झाला. ही घटना १९ मार्च रोजी दुपारी पातूर-बाळापूर महामार्गावर घडली. योगेश आनंदराव वसतकार रा. चरणगाव असे मृतक युवकाचे नाव आहे.
पातूर तालुक्यातील चरणगाव येथील योगेश वसतकार हा दुचाकी क्रमांक एमएच ३० एसी १४९२ ने पातूरकडे जात होता. दरम्यान, समोरून येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच ३१ सीजी ७९३५ ने त्याच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर मोगरे, अवचार, मनीष घुगे आदींनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने जखमी युवकास अकोला येथे पाठविले; मात्र उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी वृत्त लिहीस्तोवर पातूर पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.
वीट, डस्टची वाहतूक ठरतेय जीवघेणी
पातूर-बाळापूर तथा पातूर-अकोला महामार्गा वरून दिवसभर विटा आणि डस्टची वाहतूक ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिवसभर राहते. या वाहनांमधून विटा आणि डस्ट उतरवल्यानंतरही मोठ्या प्रमाणात धूळ शिल्लक राहते. ही धूळ रस्त्याने जात असताना दुचाकी चालकांच्या डोळ््यात जात असल्याने या मार्गावर अपघातामध्ये वाढ झाली आहे. ट्रक आणि ट्रॅक्टर चालकांना विटा किंवा डस्ट खाली केल्यानंतर धूळ स्वच्छ करण्यास तंबी देण्याची गरज आहे. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.