अंत्यसंस्कारासाठी दोन ट्रक जळाऊ लाकडे पाठवली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:14 AM2021-05-03T04:14:11+5:302021-05-03T04:14:11+5:30
अकोट : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच मृत्यूंची संख्याही वाढत चालली आहे. अशा प्रसंगी ...
अकोट : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच मृत्यूंची संख्याही वाढत चालली आहे. अशा प्रसंगी अंत्यसंस्कारकरिता अकोट येथील टिम्बर असोसिएशनने दोन ट्रकमध्ये २० टन जळाऊ लाकडे दि.३० एप्रिल रोजी पाठवून मदतीचा हात दिला.
जिल्हात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांची चिंता वाढली आहे. दररोज अंत्यसंस्कारासाठी हिंदू स्मशानभूमीत जळाऊ इंधन मोठ्या प्रमाणात लागत आहे. त्यामुळे अकोट येथील टिम्बर असोसिएशनमार्फत मदतीचा हात पुढे करीत अंत्यसंस्कारासाठी जळाऊ इंधन देण्याबाबत प्रस्ताव अकोला वनविभाग उपवनसंरक्षक के. आर. अर्जुना यांच्याकडे मांडला होता. तसेच त्यांनी अकोला महानगरपालिका आयुक्तांसोबत चर्चा केली. त्यानंतर अकोट येथील टिम्बर असोसिएशनमार्फत अकोला येथील हिंदू स्मशानभूमीस दोन ट्रकमध्ये २० टन जळाऊ लाकडे पाठविण्यात आली. (फोटो)