अकोला ते पिंजर रस्त्यावर दोन वाहनांचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 07:31 PM2017-09-11T19:31:23+5:302017-09-11T19:32:09+5:30
अकोला ते पिंजर रस्त्यावर ११ सप्टेंबरच्या दुपारी १ वाजताच्या सुमारास अकोल्याकडून जाणाºया विनानंबरच्या मालवाहू वाहनाने वडगाववरून पिंजरकडे जाणाºया दुचाकीला पिंजरनजीक मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातामध्ये कल्पना प्रकाश सावंत (३७) रा. वडगाव हिच्या डोक्याला जबर मार लागला आहे. दुचाकीचालक प्रकाश शंकर सावंत (३९) रा. वडगाव यांच्या हाताला व पायाला मार लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंजर : अकोला ते पिंजर रस्त्यावर ११ सप्टेंबरच्या दुपारी १ वाजताच्या सुमारास अकोल्याकडून जाणाºया विनानंबरच्या मालवाहू वाहनाने वडगाववरून पिंजरकडे जाणाºया दुचाकीला पिंजरनजीक मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातामध्ये कल्पना प्रकाश सावंत (३७) रा. वडगाव हिच्या डोक्याला जबर मार लागला आहे. दुचाकीचालक प्रकाश शंकर सावंत (३९) रा. वडगाव यांच्या हाताला व पायाला मार लागला आहे.
संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे दिनेश चव्हाण, परमेश्वर शिंदे, रामेश्वर शिंदे, अरविंद सावंत यांनी या दोन्ही जखमींना घटनास्थळावरून पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ.आगलावे यांनी कल्पना सावंतला पुढील उपचारासाठी अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. संत गाडगेबाबा पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना या अपघाताची माहिती पथकाचे सदस्य अरविंद सावंत यांनी दिली आणि घटनास्थळावरून मालवाहू गाडीसह पसार झालेला चालक महानमार्गे पळाल्याचे सांगितले. पथकप्रमुख दीपक सदाफळे आणि विकी साटोटे यांनी तातडीने पथकाच्या रेस्क्यू व्हॅनने त्या दिशेने प्रवास सुरू केला. या पथकाची गाडी महानमध्ये गजाननराव वाघमारे यांच्या मेनरोडवरील मेडिकलवर पोहचली. तेथे त्यांनी अपघात करून फरार झालेल्या वाहनाबद्दल चौकशी केली. तेवढ्यातच तेथे बार्शीटाकळीहून आलेल्या शाळकरी मुलांनी दीपक सदाफळे यांना दगडपारव्याजवळ १०-१५ मिनिटांपूर्वी एका मुलाचा अपघात होऊन तो रस्त्यावर पडला असल्याची माहिती दिली. पथकप्रमुख दीपक सदाफळे यांना त्याच वाहनाने हा अपघातदेखील केला असावा, असे वाटल्याने त्या मुलाला मदत करण्यासाठी त्यांची रेस्क्यू व्हॅन बार्शीटाकळीच्या दिशेने वळविली; परंतु दगडपारवा ते बार्शीटाकळीपर्यंत जाऊनही त्या वाहनाचा व जखमी मुलाचा कुठे पत्ता लागला नाही. शेवटी पुन्हा बार्शीटाकळीवरून रेस्क्यू व्हॅन घेऊन ते घटनास्थळी पोहोचले. त्या मालवाहू गाडीला नंबरप्लेट नसल्याने तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या परिसरात दररोज त्याच प्रकारची नवीन चार ते पाच मालवाहू वाहने निंबू भरण्यासाठी येत असतात. त्यांच्या जाण्या-येण्याच्या वेळा मॅनेज करण्यासाठी ते भरधाव प्रवास करतात. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.